Home Breaking News मुसळधार पावसाने कर्मवीर कन्नमवार जलाशयातील पाण्याचा पातळीत वाढ..

मुसळधार पावसाने कर्मवीर कन्नमवार जलाशयातील पाण्याचा पातळीत वाढ..

766

ब्युरोचिफ प्रशांत शाहा
गडचिरोली:
जिल्ह्यातील एकमेव व सर्वात मोठा असलेला चामोर्शी तालुक्यातील रेगडी या गावातील कर्मवीर कन्नमवार जलाशयाच्या पाण्याचा पातळीत वाढ झाली आहे
काल रात्रो गडचिरोली जिल्यातील अनेक भागात मुसळधार व अतिमूसळधार पाऊस पळला यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सध्या संतुष्ट दिसत आहेत.

चामोर्शी तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी रेगडी येथील जलाशयाचे पाण्यात वाढ झाल्याने खुश असून ते जलाशय कडे धाव घेतांना दिसत आहेत. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने तालुक्यातील अनेक शेतकरी चिंतेत होते
मात्र आत्ता काल झालेल्या मुसळधार पावसामुळे रेगडी जलाशयाच्या पाण्यात वाढ झाली असल्याने शेतकरी समाधानी झाल्याचे दिसत आहेत.

सध्या तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता दूर झाल्याची चित्र दिसत आहे. कर्मवीर कन्नमवार जलाशयात सध्या 60 ते 70 टक्के पेक्षा जास्त पाणी असल्याचे माहिती समोर येत आहे

Don`t copy text!