नुकसान ग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी-विजय तोकला.. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी तहसीलदार यांना निवेदन..

0
120

विजय तोकला
इंडिया दस्तक सिरोंचा तालुका प्रतिनिधी

सिरोंचा-(दि.11 सप्टेंबर) सिरोंचा तालुक्यात मागील दोन दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण सिरोंचा तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.नदी नाले तुडुंब भरून वाहिले,या ढगफुटीसदृश पावसामुळे अनेक ठिकाणी जमिनीचे  पीक जमिनीदोस्त झाले हातातोंडाशी आलेली शेतपिक व भोई-ढीवर समाज बांधवांचे अनेक जाडे-डोंगे वाहून गेल्याचे तक्रार मा.तहसीलदार साहेब यांच्याकडे सोपविण्यात आले.

मासेमारी करणारे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे नुकसानीचे शासनाने तात्काळ पंचनामे करावेत,नुकसान ग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सिरोंचा येथील सामाजिक कार्यकर्ते विजय तोकला यांनी आपल्या इंडिया दस्तल पोर्टलच्या माध्यमातून केली आहे.

सिरोंचा तालुक्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.प्रत्येक पुलावरून पाणी वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे.वीज पुरवठाही मोठ्या प्रमाणावर खंडित झाला आहे.शेतीपिके चांगली आल्याने शेतकऱ्यांनी खते-औषधी मेहनतीवर मोठा खर्च केलेला होता,दिवस-रात्र काबाकष्ट करून तळहाताच्या फोडाप्रमाणे शेतातील पिके जोपासली होती पिके चांगली दिसून आल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

मात्र सध्या या झालेल्या ढगफूटसदृश पावसामुळे व गोसिखुर्द धरण्यातील पाण्याच्या विसर्गामुळे पिकांची व मासेमारी लोकांचे अतोनात नुकसान झाले असून याची दखल प्रशासनाने घेऊन लवकरात लवकर शेती व मासेमारी करणारे लोकांचा जागेवर जाऊन पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना व मासेमारी बांधवाना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here