नागपूर – नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीत पाच जण बुडून मरण पावल्याची घटना रविवारी सकाळी घडली. ही मुले यवतमाळ जिल्ह्यातील रविहासी आहेत.
नागपुर जिल्ह्यातील एका दर्ग्याला दर्शनासाठी बारा जणांचा एक गट यवतमाळहून आला होता. दर्गा दर्शनानंतर हा गट नदीत पोहण्यासाठी उतरला. तथापि खोल पाण्यात पाच जण बुडाले. त्यांची माहिती स्थानिक नागरीकांनी पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी राज्य आपत्ती निवारण पथक तेथे मदत आणि शोध कार्याला लावले.
पण बराच वेळ त्यांना या पाच जणांचा ठावठिकाणा लागू शकला नाही. स्थानिक पाणबुड्यांनीही या कामी मदत पथकाला सहाय्य करीत मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. बुडालेली मुले 19 ते 22 वयोगटातील आहेत.
मृत तरुणांची ओळख पटली असून सय्यद अरबाज (२१), ख्वाजा बेग (१९), सप्तहीन शेख (२०), अय्याज बेग (२२), मो आखुजर (२१) अशी त्यांची नावं आहे. हे पाचही युवक दिग्रस येथील आहेत.