चंद्रपुर जिल्हातील सिनाळा येथील मंदिरात पाझरू लागले ज्ञानाचे धडे

0
244

चंद्रपुर: गेल्या दीड वर्षांपासून जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. पहिली लाट गेल्यानंतर दुसरी लाट आल्याने ताळेबंदी सुद्धा करण्यात आली. पण सध्या हळूहळू सर्वत्र शिथिलता होत असली तरी अजूनही पहिली-सातवी शाळा सुरू झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थी ज्ञानापासून वंचित राहू नये म्हणून चंद्रपुर तालुक्यातील जि. प. शाळा सिनाळा येथील शिक्षकांनी पुढाकार घेऊन आणि कोरोनाचे सर्व नियम पाळून गावातील मंदिरात शाळा सुरू केली आहे.

मंदिरात शाळा सुरू करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शाम म्हशाखेत्री, शाळेचे मुख्याध्यापक दयालवार सर, शिक्षक कासमगोट्टूवार सर, श्रीमती रामटेके मॅडम, सौ. रेखा केसकर मॅडम, सौ. चौधरी मॅडम यांनी पुढाकार घेतला. मंदिरात शाळा सुरू केल्याने गावातील पालकवर्गानी सर्व शिक्षक वृंदाचे आभार मानले आहेत.

गावातील मंदिरामध्ये आमच्या मुलांना ज्ञानाचे धडे देण्यासाठी शिक्षकांनी घेतलेला पुढाकार नक्कीच प्रशंसनीय आहे. पण पालक म्हणून मला असे वाटते की शासनाने लवकरात लवकर शाळा सुरू करून आमच्या पाल्यांना शाळेत शिक्षण द्यावे.

शाम म्हशाखेत्री
अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here