दिपक साबने,जिवती
प्रत्येक विद्यार्थाना त्यांच्या जीवनात असलेले शिक्षणाचे महत्त्व समजणे गरजेचे असून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यास ते आपल्या गरीब परिस्थितीवर मात करून जीवनात यशस्वी होतील असे विद्यार्थी घडविण्याचे ध्येय समोर ठेऊन प्रशांत लोखंडे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्ह्यात संस्थेचे कार्य सुरू असून नुकतेच जिल्ह्यातून नावीन्य पूर्ण उपक्रम करीता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पालडोह ची निवड करून येथील इयत्ता ५ वी ते ६ वी वर्गात शिक्षण घेणाऱ्या ५३ विद्यार्थाना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले .
शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष संगीता हाके अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती तर उदघाटक म्हणून अंजना भीमराव पवार , सभापती पंचायत समिती, जिवती, साहित्य वितरक म्हणून प्रशांत लोखंडे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूर, प्रमुख अतिथी म्हणून संदीप पवार , रुख्मिनी सूर्यवंशी , सखुबाई पवार , अर्चना भार्गव, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र परतेकी, मॅजिक बस संस्थेचे योगेश मोरे, नितेश मालेकर, मुकेश भोयर, सुरेंद्र खंडेराव, शाळेचे शिक्षक मनोहर राजगिरे, सुरेश पानघाटे, सिद्धेश कंकावरे आदी उपस्थित होते .
कार्यक्रमाची रूपरेषा व जीवनात शिक्षणाचे महत्त्व त्यामुळे होणार शैक्षणिक गुणवत्ता विकास या करिता आवश्यक गरजा या वर आधीरीत मार्गदर्शन व प्रास्ताविक प्रशांत लोखंडे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूर यांनी केले
तर जिवती तालुका सारख्या दुर्गम भागात 365 दिवस शिक्षण हा उपक्रम राबवून शैक्षणिक गुणवत्तेकडे वाटचाल करणारी शाळा म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची ओळख असल्याची माहिती अंजना पवार सभापती पंचायत समिती जिवती यांनी आपल्या मार्गदर्शनात दिली .
तर कार्यक्रमाचे संचालन शाळेची विद्यार्थी निरा पांचाळ , साक्षी सुरणार यांनी केले तर आभार सुहानी धुलगुंडे यांनी केले
कार्यक्रमाच्या यशस्वीत ते करिता शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक ,विद्यार्थी , मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चे कर्मचारी यांनी प्रयत्न केले .