खळबळजनक: करणकोंडी येथील नाल्यात आढळला अज्ञात नवजात अर्भकाचा मृतदेह…अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्ह्याची नोंद:संपूर्ण परिसरात खळबळ

0
622

जिवती/दिपक साबने

जिवती: तालुक्यातील ७ ते ८ किमी अंतरावर असलेल्या करणकोंडी या गावातील नाल्यात नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आल्याची घटना काल गुरुवार दिनांक ०२ सप्टेंबर २०२१ ला उघडकीस आली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गावालगत असलेल्या नाल्यात नवजात अर्भकाचा मुतदेह आढळून आल्याचे गावातील बळीराम राठोड व श्रीपाद राठोड यांच्या निदर्शनास आले असता त्यांनी तात्काळ जिवती येथील पोलीस स्टेशनला माहिती दिली.
माहिती प्राप्त होताच पोलीस स्टेशन जिवती येथील मरापे मेजर व त्यांची चमू घटनास्थळी पोहोचून नाल्यामध्ये असलेल्या अज्ञात नवजात अर्भकाच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेहाला ताब्यात घेतले.
परिसरात खळबळ उडल्यामुळे नवजात अर्भकाला नाल्यात टाकून देणारे माता पिता किती निर्दयी असतील ? का एका नवजात अर्भकाचा जीव घेतला ? असे का केले असेल ? असे अनेक प्रश्न सर्वांनाच पडले आहेत आणि अस्वस्थ करून टाकणारे आहेत.
अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सचिन जगताप पोलीस निरीक्षक जिवती व त्यांची चमू करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here