Homeचंद्रपूरराजुरा50 हजार 740 रुपयांचे सागवान लाकडे जप्त...राजुरा वनविभागाच्या भरारी पथकाची कारवाई

50 हजार 740 रुपयांचे सागवान लाकडे जप्त…राजुरा वनविभागाच्या भरारी पथकाची कारवाई

मध्य चांदा वन विभागाचे संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन राजुरा या भरारी पथकाला मिळालेल्या माहितीवरून कोरपना उपवनक्षेत्रातील काही लोकांकडे जाऊन तपासणी केली असता घरगुती सामान बनविण्यासाठी अवैधरित्या जंगलातून आणलेले सागवान लाकडे आढळून आल्याने जप्तीची कारवाई करून वन गुन्हा दाखल करण्यात आला या सागवान लाकडाची सुमारे 50 हजार 740 रुपये किंमत असल्याचे वन अधिकाऱयांनी सांगितले.

मिळालेल्या गुप्त माहितीवरून राजुरा येथील संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन या भरारी पथकाचे वन परिक्षेत्र अधिकारी विनायक नरखेडकर यांनी अधिनस्त वनकर्मचारी यांना घेऊन वनसडी वनपरिक्षेत्राचे कोरपना उपक्षेत्रातील मांडवा येथील सुरेश गणपत क्षीरसागर यांचे घरी धाड टाकली असता सोफासेट चे लाकडे,दिवाण पलंगचे चिरान लाकडे असा एकूण 24 हजार 555 रुपये किमतीचा 109 नग लाकडे अवैधरित्या आढळून आले यावरून सदरचा लाकडी सामान जप्त करून सुरेश क्षीरसागर याच्याविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला

तसेच दुसरे कारवाईत सावलहिरा नियतवन क्षेत्राचे सावलहिरा गावातील दिवाकर हंसकर व मारोती हंसकर यांचे घरी धाड टाकली असता यांचे घरातून फर्निचर साठी अवैधरित्या आणलेले सागवान प्रजातीचे 25 हजार 185 रुपये किमतीचे 104 नग जप्त करण्यात आले त्यावरून दिवाकर हंसकर व मारोती हंसकर यांचे विरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे अवैधरित्या सागवान झाडाची तोड करून फर्निचर तयार करणाऱ्या तस्कराचे धाबे दणाणले आहे ही कारवाई उपवनसंरक्षक अरविंद मुंढे ,दक्षता विभागीय वन अधिकारी यांचे मार्गदर्शनात पथक प्रमुख वनपरिक्षेत्र अधिकारी विनायक नरखेडकर,वनपाल विकास शिंदे,वनपाल अशोक नंदगिरीवार,वनरक्षक सीमा तुराणकर,गणेश बनकर यांनी केली आहे

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!