अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक..

0
401

दिपक साबने,जिवती

जिवती : येथून १४ किमी अंतरावर असलेल्या येल्लापुर ग्रामपंचायत अंतर्गत कोलामगुडा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

मागील ४ ते ५ वर्षापासून आरोपी धर्मराज बाबासाहेब कांबळे (२३) हे अल्पवयीन पीडिता चे शारीरिक शोषण करत होता. इतक्यात मुलीची तब्बेत अचानक बिघडल्याने उपचाराकरिता दवाखान्यात नेण्यात आले. तिथे ती गर्भवती असल्याचे समजले असता तिला नागपूरला हलवण्यात आले. तिथे मुलीचा जन्म झाला आणि ती अल्पवयीन माता झाली. दुर्दैव अस की जन्माला आलेल बाळ मरण पावल.
पीडिता च्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून जिवती पोलिसांनी आरोपी धर्मराज बाबासाहेब कांबळे (२३) याला अटक करत कलम ३७६, ३७६(अ), ३७६(२)(एन),ipc4, ipc6, POSCO नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचांदूर यांच्या मार्गदर्शनात सचिन जगताप ,पोलीस निरीक्षक,पोलीस स्टेशन जिवती हे करत आहेत.

कोट : पीडितेच्या परिस्थितित सुधार आहे,

आरोपीला चंद्रपूर येथे ठेवण्यात आले आहे,
DNA रिपोर्ट आल्यावर समोरची कारवाही केली जाईल.
– सचिन जगताप
– पोलीस निरीक्षक जिवती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here