ब्रेकिंग न्यूज: वाघाच्या हल्ल्यात इसमाचा जागीच मृत्यू…

768

रुपाली रामटेके (मूलचेरा तालुका प्रतिनिधी)
मुत्ता रामा टेकुलवर वय अंदाजे (50) यांनी शेतात जात असताना वाघांने हल्ला करून त्यांना जागीच ठार केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी मूलचेरा तालुक्यातील येल्ला या गावात घडली. या घटनेने गावात खूप खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत्यू झालेल्या इसमाच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि सहाव्या वर्गात शिकत असलेला मुलगा आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.