तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयात डॉ. मंजुषा कानडे यांचे विवाह समुपदेशन या विषयांवर व्याख्यान संपन्न…

0
32

नागपूर: तिरपूडे समाजकार्य महाविद्यालयातर्फे गुरुवार, दि २ सप्टेंबर २०२१ ला ऍडव्हान्स पी जी डिप्लोमा इन काऊंसलिंग या अभ्यासक्रमाअंतर्गत विवाह समुपदेशन या विषयावर उच्च न्यायालयातील निवृत्त विवाह समुपदेशिका डॉ.मंजूषा कानडे यांचे व्याख्यान आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरवात पी.जी. डिप्लोमा ची विद्यार्थिनी डॉ.किर्ती पाटिल कडून प्रमुख वक्त्यांचा परिचय व स्वागताने झाली. त्यानंतर प्राध्यापिका शिल्पा जिभेनकर यांनी सदर कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश आपल्या प्रास्ताविकेतून सांगितला.

त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक डॉ.मंजूषा कानडे यांनी अतिशय सुंदर आणि सुलभ रितीने विवाह समस्या किती प्रकारच्या व कशा असतात तसेच त्या सोडविण्यासाठी काय करावे हे आचरणात्मक बोधात्मक, भावनात्मक रितीने स्पष्ट केले. त्यानंतर काही प्रश्नोत्तरे झाली. यावर कानडे मॅडमनी अतिशय समर्पक उत्तरे दिली.

यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.स्वाती धर्माधिकारी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रमुख वक्त्यांच्या अनेक मुद्द्यांचे समर्थन करून उपयुक्तता सांगितली. विद्यार्थ्यांबरोबरच प्राध्यापक डॉ.रोशन गजबे आणि प्राध्यापिका डाॕ.शिल्पा पुराणिक यांनी सुद्धा प्रश्नोत्तरी मधे सहभाग दाखवला.

सदर कार्यक्रम हा विभागिय पातळीवर झाला. त्यामुळे विषयाची गरज ओळखून विदर्भातून अनेक ठिकाणाहून लोक आभासी माध्यमाने उपस्थित झाले आणि हा कार्यक्रम खरोखरच अत्यंत प्रशंसनीय झाला. कार्यक्रमाचे संचालन सौ.किर्ती पाटील तर आभार प्रदर्शन सौ.मानसी रहांगडाले यांनी केले. तांत्रिक सहकार्य व मंच व्यवस्था दिनेश मंडपे यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापिका सौ.संध्या फटिंग, ज्योती भारद्वाज, स्वर्णिमा कमलवार, स्वाती पाटील, मुकुल पराते, सुरज दहागावकर यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here