Homeआरमोरीज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन जनजागृती कार्यक्रम...

ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन जनजागृती कार्यक्रम…

गौरव लुटे प्रतिनिधी

गडचिरोली :- स्थानिक गडचिरोली येथील ज्येष्ठ नागरिक संस्था कार्यालय तथा विरंगुळा केंद्र या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या *हेल्पलाइन 14567* बाबत सविस्तर माहिती व हेल्पलाइनचे ध्येय, धोरण, आणि हेल्पलाइन अंतर्गत पुरविण्यात येणार्‍या सेवा संदर्भात माहीती देण्यात आली.

ज्येष्ठ नागरिकांच्या राष्ट्रीय हेल्पलाईनची सुरुवात लवकरच राज्यात होत असून हेल्पलाइन क्रमांक – 14567 असा आहे. *सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय भारत सरकार मार्फत* देशभरातील जेष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी सर्व राज्यात हेल्पलाइन सुरू करण्यात येत आहे.

राज्य शासनाचा *सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जनसेवा फाऊंडेशन पुणे व राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान* यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यामध्ये ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाइन चाळवली जाणार आहे. या हेल्पलाइन च्या माध्यमातून 1 *) माहिती देणे, 2) मार्गदर्शन करणे 3) भावनिक आधार 4) प्रत्यक्ष मदत 4 मुख्य सेवा दिल्या जातात* ,त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना असणार्‍या समस्या हेल्पलाइन क्रमांक – *14567* या क्रमांकावर मांडाव्यात असे क्षेत्रीय प्रतिनिधी गणेश शेंडे यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष – पी. एच. घोटेकर, सचिव – एस. के. बावणे, कोषाध्यक्ष – आर. टी. हेमके, सहसचिव – एस. एच. म्हशाखेत्री, इतर सदस्य, सल्लागार व तालुका प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!