गरोदर महिलेच्या वाटेला जे आलं ते वाचून तुम्ही हादरून जाल….

0
775

ब्युरोचिफ प्रशांत शाहा
गडचिरोली* : शासनाकडून प्रत्येक गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मूलभूत सुविधांसह रस्ते व पुलांच्या बांधकामावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. शासनाच्या या प्रयत्नानंतरही मुलचेरा तालुक्यातील वेंगणूर ग्रामपंचायत विकासापासून कोसो दूर आहे. पूलाअभावी पावसाळ्यातील चार ते पाच महिने या ग्रामपंचायतीचा बाह्य जगाशी संपर्क तुटत असून नागरिकांना नाईलाजास्तव जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीला नुकतेच ३९ वर्ष पूर्ण झाले. मात्र, या जिल्ह्यात दुर्गम भागातील गरोदर मातांचा जीव अजूनही धोक्यातच आहे. आज सकाळी एका गरोदर मातेला प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यासाठी गावकऱ्यांना त्या गरोदर मातेसह आपला स्वतःचा जीव धोक्यात टाकून प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावे लागले.

काल रात्रीपासून वेंगणुर येथील सुमित्रा नरोटे या गरोदर महिलेला अचानक प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. गावात दवाखाना नसल्याने प्रसूतीसाठी ९ किमी अंतरावर असलेल्या रेगडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गेल्याशिवाय पर्यायही नव्हते. मात्र, रस्त्यावर मोठे नाले आणि नाल्यात साचलेला कन्नमवार जलाशयाचा पाणी यामुळे बोटीच्या साहाय्याने रात्रीचा जलप्रवास शक्य नसल्याने त्या गरोदर मातेला रात्रभर वेदना सहन करत ताटकळत पडून राहावे लागले.

पहाटे गावकऱ्यांनी कसेबसे ९ किमी प्रवास करून प्रशासनाने दिलेल्या बोटीच्या साहाय्याने कन्नमवार जलाशय ओलांडले आणि रुग्णवाहितकेतून प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. सध्या तिच्यावर रेगडी येथे उपचार सुरू आहे. गरोदर मातेला नावेवरून रुग्णवाहिकेत आणण्याकरीत वेंगणुर येथील उपसरपंच नरेश कांदो रेगडी येथील समाज सेवक प्रशांतभाऊ शाहा,रवी दुधकोहरे व रुग्णवाहिकेचे चालक कृष्णा बरलावार यांनी मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here