जिवती:कुलदीप शेवरेन यांच्या मालकीचा बारा चाके असलेला एमएच ३४-०५६४ क्रमांकाचा ट्रक सास्ती रोड येथून चोरून नेल्याची तक्रार जिवती पोलिसात देण्यात आली. तक्रारीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार व पोलीस निरीक्षक अरविंद बहाद्दूरे यांच्या मार्गदर्शनात एक तपास पथक रवाना केले. ज्या मार्गाने ट्रक गेला त्या आदिलाबाद, नांदेड, किनवट,माहूर, यवतमाळ या मार्गातील कॅमेरे तपासणी करीत जात असताना आर्णी ते दिग्रस रोडवर पाठलाग करताना ट्रकचालकाला संशय आला. अंधाराचा फायदा घेऊन तो ट्रक थांबवून पसार झाला. लगेच पोलिसांनी तो ट्रक ताब्यात घेतला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.
पकडलेला ट्रक पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. ही मोहीम सहायक पोलीस निरीक्षक एस. व्ही. दरेकर, पोलीस हवालदार रवी नक्कनवार, खुशाल टेकाम, किशोर तुमराम, योगेश पिदूरकर, नायक पोलीस नागोराव भेंडेकर यांनी केली.
चोरून नेलेला ट्रक सापडला, आरोपी मात्र झाला फरार..
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements