Home Breaking News रासेयो कोविड योध्दा जिल्हास्तरीय पुरस्काराने सारंग जांभूळे सन्मानित...

रासेयो कोविड योध्दा जिल्हास्तरीय पुरस्काराने सारंग जांभूळे सन्मानित…

 गौरव लुटे(आरमोरी तालुका प्रतिनिधी)

*आरमोरी* – कोविड – १९ महामारीची परिस्थिती मागील संपूर्ण वर्षात राज्याच्या विविध भागात आहे.अश्या परिस्थितीत रासेयोच्या स्वयंसेवकांडून विविध पातळ्यांवर, विविध मदत कार्य करण्यात आले.अश्या केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्याकरीता, राज्यातील प्रत्येक जिल्हानिहाय एका स्वयंसेवकाची निवड करून मा.मंत्री ( उच्च व तंत्रशिक्षण ) महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते जिल्हास्तरावरील पुरस्कार देण्याकरिताची संकल्पना व तसे निर्दश प्राप्त झाले.त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील एका रासेयो स्वयंसेवकाची निवड ” रासेयो कोविड योध्दा जिल्हास्तरीय पुरस्कार ” यासाठी करण्यात आली.

या पुरस्कासाठी महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी येथील “सारंग नरेंद्र जांभूळे” या विद्यार्थ्याची निवड करण्यात आली. अतिशय बिकट परिस्थितीत कोरोणा महामारीच्या काळात रासेयोच्या माध्यमातून समाजातल्या गोरगरिबांपर्यंत मदतीचा हात पोहोचविला. समाजाप्रती एकनिष्ठ राहून उल्लेखनीय कार्य पार पाडले.

विविध सामाजिक,क्रिडा, राजकीय कार्यात सारंग विशेष रस दाखवत असतो.त्याने स्वतः १०० मास्क घरी तयार केलेले मास्क आणि सोबत लाईफबॉय साबण विकत घेऊन त्यांचे गरजूंना मोफत वितरण केले.

लॉकडाउन मध्ये अनेक शेतकऱ्यांनी फळभाज्या व पालेभाज्या गरजू लोकांना देऊ केल्या. त्या स्वतः शेतकर्‍यांच्या शेतातून प्राप्त करून गरजूपर्यंत मोफत पोचविल्या. रुग्णालयात फळ आणि बिस्कीट वाटपाच्या ३ उपक्रमांतून रुग्णांना मायेचा आधार दिला. व्हाटस् अॅप च्या मदतीने रुग्णांना आॅक्सिजन बेड व व्हेंटिलेटर मिळण्यासाठी मदत केली.

ब्रम्हपुरी येथील माध्यमिक शाळेच्या माजी मुख्याध्यापिकेला कोरोना संक्रमण झाल्याने गंभीर अवस्थेत होशंगाबाद, भोपाल, मध्यप्रदेश येथे दाखल करण्यात आले होते. मात्र रेमडिसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याने त्यांना इंजेक्शन मिळत नव्हते. यावेळी सारंगने आॅनलाईन शोध घेऊन मध्यप्रदेश युथ काँग्रेस फेसबुक पेजच्या माध्यमातून प्रशांत पाराशर व नरेंद्र यादव यांच्याशी संपर्क करून तसेच होशंगाबाद भोपाल येथील जिल्हाधिकारी यांचेशी संपर्क साधून रेमडिसीवीर इंजेक्शन्स उपलब्ध करून दिले व आपल्या माजी शिक्षिकेचे प्राण वाचवण्यात मौलिक भूमिका बजावली.
मित्रा च्या मदतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले. यात 13 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

तसेच बुद्धपोर्णिमेच्या निमित्ताने गरजू व भटकंती करणार्‍या लोकांना भोजनदान केले. शिवकालीन पिंड जवळील जागा अतिशय घाण असताना स्वच्छ करून तिथे स्वच्छता चा फलक लावला . महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालया तर्फे आयोजित रक्तदान शिबीराला सहकार्य केलं .मित्रांच्या सहाय्याने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करून रोपांची लागवड करण्यात आली.

कोरोना आजार आणि लसीकरण यांच्याबाबत जनजागृती करण्यासाठी व्हिडिओ तयार करून व्हाटस् अॅप च्या माध्यमातून अनेकांना पाठविला. महाराष्ट्र शासन, युनिसेफ, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या कडून प्राप्त होणारी माहिती, पोस्टर्स आणि व्हिडिओ स्थानिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले.
NSS , department of youth empowerment and sport Government of Karnataka ani Yenepoya ( demeed to be university) यांच्या संयुक्त विद्यमानाणे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरच्या Young warrior nss award चा finalist आणि अवॉर्ड चा विषय your contribution in society during covid 19 times.होता. यात तो सहभागी झाला होता. आता रासेयो कोविड योध्दा पुरस्काराने त्याच्या यशाच्या, सामाजिक कार्यात भर पडली आहे.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार; उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना स्पष्टच सांगितले.

राज्यात शिवसेनेचे मातब्बर नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेंसोबत सर्व बंडखोर आमदार सध्या गुवाहटीमध्ये...

सांगली हादरल! एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या, विष घेत आयुष्य संपवलं

सांगली – म्हैसाळकारांचा सोमवारचा दिवस उजाडला तोच एका हादरवणाऱ्या बातमीनं.. गावात परिचित असलेल्या दोन भावांच्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची माहिती काही क्षणांत गावातल्या घराघरात...

मोठी बातमी: जेष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना कॅन्सरचे निदान.. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु

चक्रधर मेश्राम पुणे: जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना ब्लड कँसरचे निदान झाले असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमटे यांना दुर्मिळ अशा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

गोंडपिपरीत तालुक्यात कृषी संजीवनी मोहीमेला प्रारंभ… कृषी विभागाकडून प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन…

शरद कुकुडकार (भंगाराम तळोधी प्रतिनिधी) भंगाराम तळोधी :- 25 जून ते 1 जूलै या दरम्यान राज्यात सर्वत्र कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे याच धर्तीवर...

अकोल्यातून गडचिरोली जिल्ह्यात नकली नोटा पोहचविण्याचा प्रयत्न

सिरोंचा : झटपट पैसे कमावण्याच्या नादात नकली नोटा चलनात आणण्यासाठी अकोला येथून घेऊन येणाऱ्या तीन आरोपींना तेलंगणातील महादेवपूर पोलिसांनी शनिवारी रंगेहाथ पकडले. यातील दोघे तेलंगणातील,...

मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी सत्तेसोबत राहणे गरजेचे – आ. किशोर जोरगेवार

चंद्रपुर: मागील अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकार सोबत राहुन मतदार संघातील प्रश्न सोडविण्यासह विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करता आला. याच दरम्याण घुग्घुस नगर परिषद...

जन्मताच आईचे मातृत्व हरवलेल्या आदेशचे स्वतःची सायकल असण्याचे स्वप्न कर्मयोगीने केले पूर्ण…

नागपूर: १० दिवसापूर्वी संध्याकाळच्या वेळेला जवळपास ७ वाजले होते,अचानक एक कॉल आला. तो कॉल होता बिबी (सावळी ) त. हिंगणा जि. नागपूर या गावातील...

Recent Comments

Don`t copy text!