Advertisements
Home चंद्रपूर भद्रावती झाडाची फांदी तोडण्यासाठी झाडावर चढला पण शॉक लागल्याने जागीच मृत्यू...भद्रावती तालुक्यातील घटना..

झाडाची फांदी तोडण्यासाठी झाडावर चढला पण शॉक लागल्याने जागीच मृत्यू…भद्रावती तालुक्यातील घटना..

ज्वलंत विद्युत तारेच्या स्पर्शाने एकाचा मृत्यू… #चंद्रपुर_न्यूज

Advertisements

भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथे ज्वलंत विद्युत तारेचा स्पर्श होऊन एका गरीब शेतकरी वर्गातील युवकाचा मृत्यू झाला. या घटनेमध्ये महावितरण कंपनी जबाबदार असल्याचे नातेवाइकांचे आक्षेप असून नातेवाइकांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

गौरव माधव हरने आपल्या शेतीतील कामासाठी झाडाची फांदी तोडण्यासाठी झाडावर चढला असतात त्या झाडाच्या आत मधून ज्वलंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर तिथे बसलेले पक्षीसुद्धा मरण पावले.

या प्रकरणांमध्ये गावकरी व आप्तमंडळीनी महावितरण कंपनी जबाबदार धरले असून. जोपर्यंत कंपनी नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करण्यास नातेवाईकांनी मनाई केली आहे. महावितरण कंपनीतर्फे अभियंता लोहे यांनी तोंडी आश्वासन देत काही रक्कम जाहीर केली होती. परंतु नातेवाईकांना ते मान्य नव्हते.

24 तास उलटून सुद्धा कंपनीने काहीच मदत न केल्याने मृतदेह उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे ठेवण्यात आलेला आहे. भटाळा येथील सरपंच सुधाकर रोहणकर यांनी मोबदला दिल्याशिवाय शवविच्छेदन करून देणार नाही अशी भूमिका घेतल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. घटनास्थळी वरोरा ठाणेदार खोबरागडे सह भद्रावतीचे महावितरणचे उपअभियंते एस.ऐ.लोहे व गावकरी यांच्यामध्ये चर्चा सुरू होती.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

अनोळखी मृतदेहाला शीर नसल्याने पोलिसांसमोर होते मोठे आव्हान…चार दिवसात पोलिसांनी मृत युवतीची ओळख काढली…

भद्रावती येथे 22 वर्षीय युवतीचे नग्नावस्थेत असणारा शीर नसलेला मृतदेह मिळाल्याने एकंच खळबळ उडाली होती. मृतदेहाला शीर नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे झाले मात्र...

भद्रावतीत कोरोना नियमांना तिलांजली…

भद्रावती : कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र भद्रावतीकरण या नियमांना तिलाजंली देत असून...

पुराच्या पाण्याने सोयाबीन पीक गेले :सर्व्हे करून नुकसान भरपाईची मागणी…

भद्रावती : दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पाऊसाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असताना शेतकऱ्यांच्या शेतातील ऊभे सोयाबीन पीक नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्याने खरवडून नेल्याने...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विचारज्योत फाऊंडेशन तर्फे राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर भंडारा जिल्हाचा योगेश वासनिक प्रथम तर अहमदनगरचा योगेश कुटे द्वितीय…

चंद्रपुर: भारतीय संविधान दिन आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विचारज्योत फाऊंडेशन,चंद्रपूर तर्फे राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा...

पवन भगत यांच्या ते पन्नास दिवस… या कादंबरीला ऑथर ऑफ दि ईयर…

चंद्रपूर: बहुचर्चित कादंबरी ते पन्नास दिवस..या पुस्तकाचे लेखक पवन भगत यांना या वर्षी चा इंडियन पब्लिशर फेडरेशन च्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार...

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष… केकेझरी येथील विजेचे तार झाले धोकादायक

बळीराम काळे,जिवती जिवती :(तालुका प्रतिनिधी) तालुक्या अंतर्गत ग्राम पंचायत केकेझरी येथील लाईटचे झुकलेले खांब व तार या लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारामुळे गावकर्यांच्या जीवाला धोका निर्माण...

राहुल देवतळे यांच्या नेतृत्त्वात जिल्हा चिकित्सक यांना निवेदन…

श्याम म्हशाखेत्री (जिल्हा संपादक, चंद्रपूर) चंद्रपूर: जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे अनेक प्रकारचे रुग्ण येत असतात. रुग्णावर उपचार केल्यानंतर त्यांना ओ पी डी मधून औषध...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!