Home चंद्रपूर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायद्यांतर्गत 26 पानठेल्यांवर कारवाई... अपर जिल्हाधिकारी यांच्या...

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायद्यांतर्गत 26 पानठेल्यांवर कारवाई… अपर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात धडक मोहीम

चंद्रपूर, दि. 27 ऑगस्ट : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनात 26 पानठेल्यांवर कारवाई करण्यात आली. कोटपा कायदा 2003 ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने चंद्रपूर शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही मोहीम राबविण्यात आली.

जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर अंतर्गत्‍ आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच पोलीस विभागामार्फत शासकीय कार्यालये, हॉस्पिटल, शाळा परिसरातील पानठेल्यावर सदर कार्यवाही करण्यात आली आहे. जास्तीत जास्त लोकांना तंबाखुमूळे होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती व जाणीव होईल. तसेच नवीन पिढी तंबाखूच्या आहारी जाणार नाही, हा उद्देश सफल होईल. कोटपा कायदा 2003 ची अंमलबजावणी तसेच जास्तीत जास्त लोकांना यांच्या दुष्परिणामाची जाणीव होणे हासुध्दा या कारवाईचा उद्देश आहे. यावेळी “ करा तंबाखू, सिगारेट, जर्दा याला नकार, करा सुदृढ आरोग्याचा स्वीकार ” हा कानमंत्र देण्यात आला.

सदर कार्यवाहीमध्ये जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ. श्वेता सावलीकर, अन्न निरीक्षक श्री. सातकर , पोलीस निरीक्षक श्री. अंभोरे, पोलीस उपनिरीक्षक श्री. चव्हाण तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत येणारे समुपदेशक मित्रंजय निरंजने, सामाजिक कार्यकर्ता तुषार रायपुरे, अतुल शेंद्रे, दुर्गाप्रसाद बनकर यांनी मोलाची कामगिरी केली.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

ओबीसी योद्धा उतरला गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट निवडणूकीच्या मैदानात… प्रा.अनिल डहाके सह सेक्युलर परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी केला निवडणूक अर्ज दाखल…

प्रलय म्हशाखेत्री (चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी) चंद्रपुर: येत्या ०४ सप्टेंबर २०२२ ला गोंडवाना विद्यापीठाच्या पदवीधर मतदार संघाची निवडणूक असून अनेकांची नजर या निवडणुकीवर आहे. परंतू या...

माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने दुर्गापूर मध्ये अन्नधान्य किटचे वितरीत

चंद्रपुर: जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांच्या संसाराची राख रांगोळी झाली. अनेक घरांमध्ये पाणी घुसले, त्यामुळे अनेकांच्या घरचे अन्न धान्य खराब झाले त्याच सोबत अति...

राज्यपाल भगतसिंह ‘कोशियारी’ यांना राष्ट्रवादी युवक काँग्रसने पाठविले १० हजार पत्र.

चंद्रपूर :- घटनात्मक पदावरील व्यक्तीवर खटला दाखल करता येत नाही म्हनून सातत्याने आगाऊ, असंवेदनशील, मूर्खपणाचे, अविवेकी, बेताल, प्रक्षोभक, राजकारनाने प्रेरित वक्तव्य व वागणूक राज्यपाल...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. ८ ऑगस्ट २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम….

सोमवार दि. ८ ऑगस्ट २०२२ सकाळी ८.०० वाजता -: नागपूर येथून चंद्रपूर कडे प्रयाण सकाळी १०.०० वाजता -: शासकीय विश्रामगृह (सर्किट हाऊस),चंद्रपूर येथे आगमन व राखीव सकाळी ११.०० वाजता -:...

वंचित बहुजन आघाडीच्या माजी तालुकाध्यक्षांसह विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काॅंग्रेस पक्षात प्रवेश

ब्रम्हपुरी :- केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सध्या देशातील सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे काॅंग्रेस पक्षच या देशाला विकासाकडे नेऊ शकतो ही भावना नागरिकांमध्ये...

रस्ता दुरुस्त केल्याशिवाय धानाची उचल करू देणार नाही वॉर्ड नंबर तीन मधील महिलांचा आक्रोश

ब्युरोचीफ प्रशांत शाहा गडचिरोली:- चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील नवीन महामंळाचे गोडाऊन मधून मागील वर्षी खरेदी केलेल्या धानाची उचल केल्या जात आहे. गोडाऊन कडे जाणार मार्ग...

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. ६ ऑगस्ट २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम….

शनिवार दि. ६ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.०० वाजता -: नागपूर येथून गडचिरोली कडे प्रयाण सकाळी ९.३० वाजता -: "रानफुल' निवासस्थान पोटेगाव रोड गडचिरोली येथे आगमन व राखीव सकाळी १०.३० वाजता -:...

Recent Comments

Don`t copy text!