Homeचंद्रपूरजिवतीनात्या पलिकडचा ऋणानुबंध जोपासत माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केला रक्षाबंधन साजरा...सतत...

नात्या पलिकडचा ऋणानुबंध जोपासत माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केला रक्षाबंधन साजरा…सतत १८ वर्षांपासून माजी आमदार सुदर्शन निमकर आदिवासी बहिणींकडून राखी बांधून घेतात

दिपक साबने,जिवती
मागील १८ वर्षांपासून दरवर्षी रक्षाबंधन हा सण जिवती तालुक्यातील खडकी हिरापूर येथील आदिवासी भगिनीकडून माजी आमदार सुदर्शन निमकर हे राख्या बांधून घेऊन नात्या पलीकडील ऋणानुबंध जोपासत आहेत.
माजी आमदार सुदर्शन निमकर हे २००३ मध्ये आमदार असतांना रक्षाबंधनाच्या दिवशीच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जिवती तालुक्यातील आदिवासी बहुल खडकी व हिरापूर या गावांत गेले असता या दोन्हीगावातील आदिवासी भगिनींनी रक्षाबंधनाचे पवित्र नाते जोपासत कोणतीही पूर्वतयारी नसतांना खडकी येथील गोदाबाई भीमराव मडावी व हिरापूर येथील अंजनाबाई जंगु सोयाम यांनी सुदर्शन निमकर यांना राखी बांधल्या. तेंव्हापासून सुदर्शन निमकर हे सख्या बहिणीसारखं नातं जोपासत १८ वर्षांपासून अविरतपणे आपल्या सहकाऱ्यांसोबत खडकी व हिरापूर गावात जाऊन आदिवासी भगिनीकडून राख्या बांधून घेतात. सर्व भगिनींना साळी चोळी भेट देऊन अभिनंदन करतात.
रक्षाबंधन निमित्तानं दोन्ही गावात बहीण भावाच्या ऋणानुबंधाच वातावरण निर्माण होऊन या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात सर्व महिला भगिनी व बांधव तसेच बालगोपाल सहभागी होत असल्यामुळे गावात उत्सवाचं वातावरण निर्माण होत असते. या वर्षी रक्षाबंधन निमित्त २२ ऑगस्ट २०२१ रोजी माजी आमदार सुदर्शन निमकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव, विमाशी संघाचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक एस. बी. चंदंनखेडे, भोक्सापूर ग्रा. पं.चे उपसरपंच गोविंद मिटपल्ले, खडकी चे माजी सरपंच भीमराव पाटील मडावी वयोवृद्ध प्रतिष्ठित मारू पाटील गेडाम, सुभाष राठोड, नारायण जाधव, इमाम खान पठाण, जंगु पाटील सोयाम, पंढरी सलगर, तिरुपती पोले, पाटण येथील प्रभाकर पा. उईके, जयदेव आत्राम महाराज, सचिन उत्तरवार, सलमान खान पठाण सह मोठ्यासंख्येने नागरिक सहभागी झाले होते.
याप्रसंगी खडकी येथील वयोवृद्ध आदिवासी समाजातील प्रतिष्ठित नागरिक मारू पा. गेडाम यांचा माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!