सून आणि भाडेकरू यांच्यात अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून ५ जणांची निर्घृण हत्या..

0
561

दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये एका घरमालकाने आपली सून आणि भाडेकरू यांच्यात अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पाच जणांची निर्घृण हत्या केली.मृतांमध्ये दोन महिला,दोन मुले आणि एका पुरुषाचा समावेश आहे.असे सांगितले जात आहे की गुन्हा केल्यानंतर,घरमालकाने स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.

हे प्रकरण गुरुग्राममधील राजेंद्र पार्क पोलीस स्टेशन परिसरातील आहे. मंगळवारी पहाटे पोलिस ठाण्यात पोहोचलेल्या एका व्यक्तीने पोलिसांना सांगितले की त्याने पाच जणांना ठार मारले आहे.तो व्यक्तीने काय म्हणतं आहे हे ऐकून पोलीस चकित झाले.जेव्हा पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले तेव्हा त्यांनी पाहिले की त्या व्यक्तीने प्रत्यक्षात आपली सून,भाडेकरू,भाडेकरूची पत्नी आणि त्याच्या दोन मुलांना मारले आहे.यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली.

पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपीने सांगितले आहे की,त्याला त्याची सून आणि भाडेकरू यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय होता.या रागाच्या भरात त्याने हा गुन्हा केला.पोलिसांचे म्हणणे आहे की त्या व्यक्तीच्या कबुली व्यतिरिक्त,घटनेच्या इतर सर्व पैलूंचा तपास केला जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here