Homeगडचिरोलीशिवसेना आणि काँग्रेसच्या मंत्र्यामध्ये रंगला बॅडमिंटनचा सामना...

शिवसेना आणि काँग्रेसच्या मंत्र्यामध्ये रंगला बॅडमिंटनचा सामना…

गडचिरोली : राज्यात कोरोनाची लाट ओसरल्यामुळे मंत्र्यांचे दौरेही वाढले आहे. आज गडचिरोलीचा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एकत्र दौरा केला.

यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बॅडमिंटनचा सामना पाहण्यास मिळाला. राज्याचे नगरविकास मंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. आज गडचिरोली येथील शासकीय जलतरण तलाव आणि जिमची पाहणी त्यांनी केली.

यावेळी गडचिरोलीतल्या बॅडमिंटन कोर्टवर एकनाथ शिंदे आणि राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यात बॅडमिंटनचा चांगलाच सामना रंगला होता. दोन्ही मंत्र्यांनी रॅकेट हातात घेऊन आपल्यातल्या खेळाडू वृत्तीचे दर्शन घडवले, नंतर दोन्ही मंत्र्यांनी येथील जिममध्ये व्यायामही केलं.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!