चंद्रपूर;शुल्लक कारणावरून भांडण उकरून काढुन एका व्यक्तीवर पती पत्नी द्वारे कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शामनगर परिसरात उघडकीस आली असुन जखमी इसमास उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शाम नगर परिसरात गुलाब दडमल व छोटू मंडल हे शेजारी राहतात. छोटू मंडल हा नेहमीच गुलाब दडमल ह्यांना त्रास द्यायचा. काल मात्र ह्याचे परिवर्तन गुलाब दडमल ह्यांच्यावर प्राणघातक हल्ल्यात झाले.
गुलाब दडमल हे कामावरून घरी परतत असताना आरोपी छोटू मंडल ह्याने त्यांना जातिवाचक शिवीगाळ सुरू केली. त्याचप्रमाणे आई बहिणीच्या घाणेरड्या शिव्या देणे सुरू केले. त्यामुळे छोटू मंडल अधिकच चिडला व त्याने गुलाब दडमल ह्यांची कॉलर पकडून शिवीगाळ सुरू करताच कुटुंबातील व परिसरातील लोक तिथे पोहोचले.
दरम्यान छोटू मंडल ह्याची पत्नी निशा मंडल हिने बाजूलाच पडलेली वीट उचलुन गुलाब ह्यांच्या गालावर जोरदार प्रहार केला. मात्र मुलांनी वडीलांना त्यांच्या ताब्यातून सोडविले व घरात जात असतानाच मागुन छोटू मंडल अचानकपणे कुर्हाड घेऊन आला व गुलाब दडमल ह्यांच्या डोक्यावर वार केला. कुर्हाडीचे पाते डोक्यात गेल्याने गुलाब रक्तबंबाळ झाले.
कुटुंबियांनी त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता त्यांना जवळपास 11 टाके घालण्यात आले असुन गुलाब ह्यांची प्रकृती गंभीर मात्र स्थिर आहे. रामनगर पोलीस ठाण्यात मुलाने तक्रार दाखल केली असुन पोलिसांनी आरोपी छोटू व त्याची पत्नी निशा मंडल ह्यांचे वर भारतीय दंड विधान 1860 च्या कलम 324, 504, 506 व 34 अन्वये गुन्हा नोंद केला
Advertisements
शुल्लक कारणावरुन शेजाऱ्यावर केला शेजाऱ्याने कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला…
Advertisements
Recent Comments
Advertisements
Advertisements