लाखनी येथे मंडल आयोग दिन साजरा…

239

लाखनी :- येथे 07 ऑगस्ट 2021 रोजी सार्वभौम युवा मंच जिल्हा भंडारा च्या वतीने मंडल आयोग दिन, जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन साजरा करण्यात आला.

1990 साली तत्कालीन प्रधानमंत्री स्मृ.विश्वनाथ प्रताप सिंह यांनी ह्याच दिवशी मंडल आयोगाची शिफारशी लागू करून ओबीसी प्रवर्गाला 27% आरक्षण जाहीर केलं होतं.
त्या ऐतिहासिक निर्णयाला 31 वर्षे पूर्ण झाली. ह्या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून संघटनेच्या वतीने लाखनी पंचायत समिती च्या सभागृहात मंडल आयोग दिन साजरा करण्याकरिता कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाला उदघाटक म्हणून पंचायत समिती विस्तार अधिकारी हुमने साहेब, अध्यक्षस्थानी लाखनी तहसील चे नायब तहसीलदार उरकुडकर, तर विशेष अतिथी म्हणून लाखनी पोलीस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक गौरी उके उपस्थित होत्या.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ओबीसी जनगणना परिषदेचे भंडारा जिल्हा समन्वयक प्रा.उमेश सिंगनजुडे, दिवाणी न्यायालय लाखनी च्या सरकारी वकील ऍड.निलमताई वैद्य, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत, कवी व लेखक प्रा.डॉ.सुरेशजी खोब्रागडे, नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशन चे जिल्हा सचिव मुकेश धुर्वे उपस्थित होते.
महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करीत दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. उदघाटक हुमने यांनी आपल्या वक्तव्यात ओबीसींच्या साठी ऐतिहासिक असलेल्या मंडल दिनाचे महत्व सांगितले. विशेष अतिथी गौरी उके यांनी आदिवासी समाजाने मुख्य प्रवाहात येण्याकरिता शैक्षणिक क्रांती घडवावी असे मार्मिक संदेश दिले, तर आपल्या अध्यक्षीय भाषणात उरकुडकर यांनी अश्या प्रकारचे कार्यक्रम सातत्याने होणे आवश्यक असल्याचे सांगितले व क्रांती दिनाबद्दल माहिती दिली.
प्रमुख वक्ते प्रा.उमेश सिंगनजुडे यांनी ओबीसी आरक्षण व मंडल कमिशन चे माहितीपुर्ण इतिहास सर्वांसमोर मांडले, मंडल दिन हा प्रत्येक ओबीसीने साजरा केला पाहिजे असे प्रतिपादन केले. प्रा.डॉ.सुरेश खोब्रागडे यांनी मंडल आयोग व सद्यस्थितीत ओबीसी आरक्षणाची परिस्थिती सर्वांसमोर मांडली, आदिवासी समुदायाची प्रत्येक क्षेत्रात आकडेवारी सहित माहिती दिली व ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी असे प्रतिपादन केले. ऍड.निलमताई वैद्य यांनी जातितोडक कार्यक्रम घेणे काळाची गरज असल्याचे सांगितले, दोन समाजामध्ये तेढ निर्माण न होता रोटी-बेटी व्यवहार होणे महत्वाचे आहे, असे मार्मिक संदेश दिले. मुकेश धुर्वे यांनी मार्गदर्शन करतांना आदिवासी समाजातील समस्या सांगितल्या व आदिवासी समाजाने एकत्र संघटित होऊन त्या समस्या सोडविण्यासाठी काम करावे अशे संदेश दिले.
ह्या प्रसंगी शकुंतला बहुद्देशीय संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी गीतावर नृत्य सादर करून जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता संघटनेचे अध्यक्ष दिपक जनबंधु, सल्लागार विजय रंगारी, महासचिव नेहाल कांबळे, मंगेश गेडाम, प्रांजल लांडगे, पवन गजभिये, सचिन रामटेके, सोहेल खान, राकेश वंजारी, चेतन निर्वाण, विश्वजित हुमने, सौरभ मेश्राम, योगेश कांबळे, प्रीती खोब्रागडे, शर्वरी भिवगडे, प्रांजली खोब्रागडे, अश्विनी लेंढारे यांनी मोलाचे सहकार्य केले.
सूत्रसंचालन संघटनेच्या संघटिका अश्विनी भिवगडे यांनी केले, प्रास्ताविक अध्यक्ष दिपक जनबंधु, तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष जयेंद्र देशपांडे यांनी केले.