युवानेतृत्व हर्षल गुळघाणे यांची रिपब्लिलन पार्टी ऑफ इंडिया(ए) च्या युवा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती…

0
223

चंद्रपुर: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या विदर्भ महिला अध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष प्रियाताई खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये युवानेतृत्व हर्षल गुळघाणे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या चंद्रपूर युवा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आले…

चंद्रपूर येथील इंडीया दस्तक न्यूज टीव्ही जिल्हा कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी चंद्रपुर जिल्हातील अवैध धंदे, दारू तस्करी, रेती तस्करी, सट्टा, वाढती गुन्हेगारी, मर्डर या सगळ्यांच्या विरोधात मी काम करेल आणि पक्षांनी दिलेली जबाबदारी मी योग्य रीतीने पार पाडणार असे मत नवनियुक्त युवा जिल्हाध्यक्ष हर्षल गुळघाणे यांनी व्यक्त केले.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या जिल्हा उपाध्यक्ष कविता महाजन, कविता पिंपळकर, प्रगती भोसले, अर्चना पवार, सचिन मंडल, पल्लवी टोंगे, संतोष बारसागडे, मनोज वाघमारे , अजय बनकर, शुभांगी चांदेकर, सलमान खान आदी प्रामुख्याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here