HomeBreaking Newsलग्नघरात येऊन नवरदेवालाच किन्नरांनी नेलं पळवून; शेवटी पोलीस ठाण्यात झाला मोठा खुलासा...

लग्नघरात येऊन नवरदेवालाच किन्नरांनी नेलं पळवून; शेवटी पोलीस ठाण्यात झाला मोठा खुलासा…

Advertisements

लग्नाच्या घरात किन्नारांनी येऊन गोंधळ घातल्याचा प्रकार उत्तर प्रदेशातील हरदोईमध्ये घडला आहे. या घरात लग्नाची तयारी सुरू होती. दरम्यान घरात येऊन किन्नरांनी गोंधळ घातला आणि नवरदेवाला पळून घेऊन गेले. पोलिसांनी या प्रकरणात तपास केल्यानंतर वेगळीच बाब समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण यापूर्वी किन्नरांसोबतच राहत होता. काही दिवसांपूर्वी त्याच्या नातेवाईकांनी त्याला लग्नासाठी घरी बोलावलं होतं. त्यानंतर किन्नर त्याला घेण्यासाठी घरी पोहोचले.

Advertisements

यापैकी एका किन्नराने तरुणाविरोधात शारिरीक शोषण, मारहाण आणि अन्य आरोप केले आहेत. पोलिसांचं म्हणणं आहे की, दोन्ही पक्षाच्या लोकांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं आहे. मात्र अद्याप कोणीच आलेलं नाही. हे ही मित्रांना वैतागून उचललं धक्कादायक पाऊल; हायवेशेजारी लटकलेल्या अवस्थेत आढळला तरुण काय आहे प्रकरण? शाहाबाद भागात राहणाऱ्या तरुणाच्या घरात काही किन्नर जमा झाले होते.

आणि त्याला आपल्यासोबत घेऊन गेले. दुसरीकडे घरात तरुणाच्या लग्नाची तयारी सुरू होती. मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वीच तरुण लग्न करण्यास पूर्णत: तयार नव्हता. मात्र कुटुंबीयांनी आधीच लग्न ठरवलं होतं.

लग्न करीत नसल्याचं सांगितल्यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी बुधवारी याबाबत पोलिसात तक्रार केली. त्यावेळी दोन्ही पक्षाला बोलावलं आणि अखेर लग्न करण्यास दोघांनीही संमती दिली. त्यानंतर मोहम्मदच्या घरी लग्नाची तयारी सुरू होती. यादरम्यान कन्नोज येथील 10 किन्नर त्याच्या घरी पोहोचले आणि धमकी देऊ लागले.

ते म्हणाले की, तरुणासाठी त्यांनी हजारो रुपये खर्च केले आहेत. शिवाय त्यापैकी एका किन्नरने तरुणासोबत आधीच लग्न केल्याचा खुलासा केला. त्यानंतर तरुणही किन्नरांसोबत निघून गेला. यानंतर मात्र एका किन्नरने तरुणाविरोधात पोलीस ठाण्यात शारीरिक शोषण, मारहाण आणि लुट केल्याचा आरोप केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.

Advertisements
Advertisements
India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!