Homeचंद्रपूरराजुराराजुरा नगरपरिषदेतील उपनगराध्यक्षाची - नगरसेवकाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल...व्हाट्स अँप गृपवर शिवीगाळ करून...

राजुरा नगरपरिषदेतील उपनगराध्यक्षाची – नगरसेवकाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल…व्हाट्स अँप गृपवर शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी…

राजुरा नगरपालिकेचे विद्यमान उपनगराध्यक्ष सुनिल देशपांडे व नगरसेवक राजेंद्र डोहे ह्यांच्यामधे व्हाट्स अँप गृपवर झालेली 
सविस्तर वृत्त असे की, सुनील देशपांडे हे न प राजुराचे विद्यमान उपनगराध्यक्ष आहेत. मागील ३५ वर्षापासुन ते सामाजीक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असुन शहरातील प्रतिष्ठीत नागरीक आहेत. दिनांक २२-०७-२०२१ रोजी आलेल्या मुसळधार पावसामुळे राजुरा शहरात सगळीकडे पाणी साचले होते.

नाका नं ३ जवळील भवानी नाल्याच्या बाजुला असलेल्या भंगार दुकानातील एक कर्मचारी पुराच्या पाण्यात अडकलेला होता. त्या ठिकाणी पाण्याची पातळी वाढत असल्याने सदर इसमाचा जिव धोक्यात आलेला होता. अशा प्रसंगी त्या इसमाला संकटातुन वाचविणे व सुरक्षीत बाहेर काढणे हे. न.प राजुराचे कर्तव्य होते.

नगराध्यक्ष अरूण धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली न.प राजुरा ने कार्यतत्परता दाखवुन सदर इसमास त्या ठिकाणावरून सुरक्षीतपणे बाहेर काढले व त्याचे प्राण सुध्दा वाचविले. ह्यासंबंधीची बातमी देशपांडे यांनी राजुरा सीटी अपडेट या व्हॉट्सअप ग्रुपवर त्याच दिवशी सायंकाळी ९ च्या सुमारास पोस्ट केली.

त्यात “न.प चे कर्मचारी आणी फायर ब्रीगेडचे कर्मचारी यांणी सदर इसमास यातुन सुखरूप बाहेर काढले नगराध्यक्ष अरूण धोटे न.प इंजिनीयर संकेत नंदवंशी यांनी सदर प्रकरण योग्य रीतीने मार्गदर्शन करून इसमाला सुरक्षीत बाहेर काढले”, असे लिहीलेले होते. त्या पोस्टवर ग्रुपवरील एका सदस्याने लाईक केले असता गैरअर्जदाराने ‘कोणी सांगले अरून धोटे नि बाहेर काढले म्हणुन अरूण धोटे पोहत गेला का दिसला विडिओ मध्ये वारे वा जनता’ असे कॉमेन्टस करत अर्जदाराशी वाद घालणे सुरू केले. त्यानंतर गैरअर्जदाराने “जो मानुस ३७६ च्या केस मध्ये अडकला असतो त्याचे अभिनंदन करता जागरूक जनता” अशी पोस्ट केली.

त्यावर गृप मधिल त्या व्यक्तीने “सुनील काका म्हणत आहे न…राजु काका ” अशी प्रतिक्रीया दिली. त्यानंतर गैरअर्जदाराने “लात मारा त्याला तो लाचार आहे. तुकडा टाकला तर कोणी कडुन पण बोलतो ” अर्जदारास अश्लील भाषेत शिवीगाळ करत व्हॉट्सअप ग्रुपवरच वाद घालायला सुरवात केली. अशा प्रकारे त्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदारास भर चौकात मारायची धमकी देउन ‘हिम्मत असेल तर मैदानात यावे, मी तयार आहे’. अशी पोस्ट करून अर्जदारास मारण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे तर अर्जदाराच्या कौटुंबीक विषयाशी संबंधीत पोस्ट करून अर्जदाराची सार्वजनीक रित्या बदनामी केली.

याशिवाय राजुरा विधानसभाचे सन्माननीय आमदार सुभाष धोटे, राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या बद्दलही अपशब्द वापरूण त्यांचीही बदनामी करण्याचा प्रयत्न केला. त्यातून अर्जदार यांची सार्वजनीकरित्या बदनामी झालेली असुन त्यांना अश्लील शिवीगाळ करूण जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चौकशी करून गैरअर्जदारावर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी राजुरा चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादूरे यांच्याकडे केली आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!