Home Breaking News चिंचवड गावातील श्री मोरया गोसावी मंदिरात शिरले पाणी...मंदिराचा अर्धा भाग पाण्यात...

चिंचवड गावातील श्री मोरया गोसावी मंदिरात शिरले पाणी…मंदिराचा अर्धा भाग पाण्यात…

प्रतिनिधि दिलीप सोनकांबळे
चिंचवड : पिंपरी-चिंचवडसह मावळात पावसाचा जोर वाढल्याने पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे चिंचवडगावातील श्री मोरया गोसावी मंदिरात पाणी शिरले. मंदिराचा अर्धा भाग पाण्यात बुडाला आहे. पवना धरण सुमारे 60 टक्के भरले असून धरणातून अजून कोणत्याही प्रकारे पाण्याचा विसर्ग सुरू झालेला नाही. केवळ पावसाचे पाणी आहे.
काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने हजेरी लावली आहे. रविवारपासून पाऊस पडत आहे. मावळात धुवांधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी, नाले, ओढे ओसांडून वाहू लागले आहेत. मावळात पावसाचा जोर वाढल्याने पवना नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. त्यामुळे चिंचवडगावातील श्री मोरया गोसावी मंदीरातही पाणी शिरले आहे.
मंदिराचा अर्धा भाग पाण्या खाली बुडाला आहे.
काही ठिकाणी नदीच्या काठच्या नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. पिंपरीतील आंबेडकर कॉलनीतील खालच्या घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे तेथील नागरिकांना बौद्ध विहारात स्थलांतरित केले. शहरातही पावसाचा जोर कायम आहे. शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. शहराच्या विविध भागात पाणीच पाणी झाले आहे. पाण्याच्या पातळीत जोरदार वाढ झाली आहे.
*वेळ आली तर आर्मी, एनडीआरएफची घेणार मदत*
पवना नदी पात्रातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. सकाळपेक्षा आत्ता पाणी कमी आहे. नदीकाठी असलेल्या पिंपरीतील आंबेडकर कॉलनीतील खालच्या घरांना पाणी लागले होते. तेथील नागरिकांची बौद्ध विहारात व्यवस्था केली. सांगवी मुळानगरलाही महापालिकेचे अधिकारी जावून आले. शहरात कोठे पाणी साचून राहिलेले नाही.

एमआयडीसीत एका ठिकाणी झाड पडले होते. उद्यान विभागाने ते झाड तत्काळ हटविले. महापालिकेचा अग्निशामक सज्ज आहे. महापालिकेचे अधिकारी आर्मी, एनडीआरएफच्याही संपर्कात आहोत. आवश्यकता भासल्यास त्यांची मदत घेतली जाणार असल्याचे महापालिका अधिका-यांनी कळविले.
*पवना धरणातून पाण्याचा विसर्ग नाही – अनवर तांबोळी*
पवना धरणाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अनवर तांबोळी म्हणाले, ‘पवना धरण परिसरात पावसाचा जोर आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. 1 जून पासून धरण परिसरात 1219 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळी 55 टक्के पाणीसाठा होता. दिवसभरात त्यात 6 टक्क्यांनी वाढ झाली. सायंकाळी 60.74 टक्के पाणीसाठा झाला. सकाळपासून 89 मिली मीटर पाऊस झाला आहे. सकाळपर्यंत धरणातील पाणीसाठा 70 टक्के होईल. धरणातून अद्याप पाण्याचा विसर्ग सुरु केला नाही. धरणातील पाणीसाठा 95 टक्क्यांच्या पुढे गेल्यानंतर पाण्याचा विसर्ग करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

ब्रेकिंग: बिबट्याच्या हल्यात बालिका गंभीर जखमी…दुर्गापूर परिसरातील घटना…

चंद्रपुर: आज रात्रौ ८:३० वाजता दुर्गापूर येथील वॉर्ड क्रमांक 1 येथील कु. आरक्षा जगजीवन कोपुलवार बाहेर अंगणात खेळत असताना बिबट्याने पकडल्याने ती गंभीर जखमी...

टायगर ग्रुप च्या सदस्यांनी बुजवले खड्डे..! महाराष्ट्र सरकार आणि त्रिवेणी कंपनीच्या निषेधार्थ टायगर ग्रुपचे सदस्य रस्त्यावर

आल्लापल्ली : सुरजागड लोह खनिज प्रकल्पातील ओव्हरलोड ट्रकान मूळे रस्त्यावर मोठ-मोठ्या खड्डे झाले आहे त्या खड्ड्यानं मुळे रोज अनेक अपघात होत आहेत आणि अपघातांची...

गोंडपिपरी तालुक्यांतील अडेगांवसह चेकदरूर दरूर धामणगांव येथे विजेचा लपंडाव. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची गांवकराची मागणी

-शरद कुकूडकार भंगाराम तळोधी प्रतिनिधी गोंडपिपरी : गोंडपिपरी तालुक्यात अडेगांवसह चेकदरूर दरूर धामणगांव येथे परीसरात विघुत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. दररोज पधरा मी ते...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

सातबारा खोडतोड व वाटप जमीन “खरेदी-विक्री “प्रकरणात तलाठ्याने निष्काळजीपणा दाखवून सुध्दा त्याचेवर अद्याप कारवाई नाही ! कागद पत्रे मागण्यास या पलिकडे तहसील कार्यालयात येवू...

चंद्रपूर :-बल्हारपूर तलाठी दप्तर मधील सातबारा खोडतोड प्रकरण उघडकीस आणणा-या प्रिया झांबरे यांना परत तहसील कार्यालयात कागदपत्रे मागण्यास येवू नये असे खडे बोल तहसीलदार...

गोंडपिपरी तालुक्यात मक्ता येथे सिमेंट काँक्रीट रोड आणि नाली बांधकाम मंजूर करण्याबाबत निवेदन

शरद कुकूडकार भंगाराम तळोधी प्रतिनिधी गोंडपिपरी : राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांना दिले निवेदन गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी अंतर्गत येत असलेल्या मक्ता येथे...

पातानिल येथील हत्ती आलापल्लीची अस्मिता; हत्तींना पडवून नेण्याचा षडयंत्र रद्द करा- साई तुलसीगारी (टायगर ग्रुप स्वयंसेवी संस्था संचालक)

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी) अहेरी: गडचिरोली जिल्ह्यातील व्यापारदृष्ट्या अहेरी तालुका सर्वाधिक विकसित भाग आहे. या तालुक्यातील आलापल्ली या गावापासून ४ किमी अंतरावर कच्च्या रस्त्याने...

विठ्ठलवाडा-आष्टी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे.. ए.जी कंन्ट्रक्शनच्या कामाची चौकशी करा-शिवसेनेची मागणी

गोंडपिपरी - गोंडपिपरी तालुक्यात सर्व बाजूने रस्त्याच्या बांधकामाचा धडाका सुरू आहे.अशातच तालुक्यातील विठ्ठलवाडा ते आष्टी मार्गाच्या रस्त्याचे अंदाजे ४५ कोटी रुपयांचे बांधकाम ए. जी...

Recent Comments

Don`t copy text!