शरद कुकुडकर भंगाराम तळोधी प्रतिनिधी
गोंडपिपरी- तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अडेगाव येथे 18 वर्ष वयावरील नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीकरनाचे आज दि.24 जुलै रोज शनिवारला आयोजन करण्यात आले असता लसीकरणाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देत 18 वर्षावरील तब्बल 110 नागरिकानी कोविशीलड लस टोचून घेतली.यात 75 पुरुष, तर 35 महिलांनी कोविशिल्ड लस घेतली.
यावेळी अडेगाव ग्रामपंचायत सरपंच सौ.रेखाताई चौधरी, उपसरपंच श्री.विजयभाऊ चौधरी, सदस्य.संतोष कोवे, शालिकभाऊ झाडे, अल्काताई नागापूरे, संगिताबाई सातपुते, सोनिताई उंबरकर, पोलिस पाटील, दामोधर राऊत, श्रावन रायपूरे संगणक चालक नरेश झाडे आरोग्य सेविका जिजाबाई तिवाडे, आशा वर्कर सुनिताबाई मेश्राम, आरोग्य अधिकारी डॉ स्वप्निल बडगे, के बि पिसे आरोग्य सेवक देवेंद्र वाघाडे आदींची उपस्थिती होते.