गोरगरिबांच्या समस्या मार्गी लावणार…

0
84

सिरोंचा :- गोरगरीब व सर्वसामान्यांचे प्रश्न व समस्या मार्गी लागावे हेच आमचे ध्येय असून त्यासाठीच शिवसंपर्क अभियान राबविले जात असल्याचे प्रतिपादन शिवसेना पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांनी केले. स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. बैठकीत प्रामुख्याने सहसंपर्क प्रमुख विलास कोडाप, जिल्हा प्रमुख रियाज शेख, उपजिल्हाप्रमुख अरुण धुर्वे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका करुणा जोशी, ज्येष्ठ शिवसैनिक विलास ठोंमरे, तालुका संघटक दुर्गेश तोकला, ऊज्वल तिवारी, बिरजू गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार म्हणाले, पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शोषित, पीडित, वंचित, शेतकरी,शेतमजूर, दुर्गम व जंगलव्याप्त भागातील नागरिकांचे समस्या जाणून घेण्यासाठी राज्यव्यापी शिवसंपर्क अभियान 12 जुलैपासून राबविण्याचे संकल्प केला आहे. या अभियाना दरम्यान गावातील व सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी उपाय म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पक्षाचे ज्येष्ठ व नेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विधानसभा निहाय दौरा करून समस्या मार्गी लावण्याचे आमचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. आढावा बैठकीचे प्रास्ताविक उपजिल्हा प्रमुख अरुण धुर्वे तर संचालन तालुका प्रमुख अमित तिपट्टीवार यांनी केले. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक रघु जाडी, सत्यनारायण दसर्ती, तुषार येन्डे, केशव नास्कुरी, नागराज गोरला, रुपेश नसापुरी, रुपेश नुकूम, वेणू कोतवडला, राजे भीमकरी, मधुकर इंगली आदी शिवसैनिक आणि शहर प्रमुख, शाखा प्रमुख व बूथ प्रमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here