भिसी येथील युवकाची राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या…

0
232

चिमूर तालुक्यातील भिसी येथील वॉर्ड क्रमांक.३ मधील रहिवासी नागेश्वर कचरू गरडकार वय – अंदाजे 26 वर्षे युवकाने स्वतःच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्त्या केली. हि घटना आज ( 22 एप्रिल ) सकाळी 11 वा.च्या सुमारास उघडकीस आली.

नागेश्वर गरडकार हा गवंडी मिस्त्री काम करीत असून तो घरी एकटाच राहत होता. घटनेच्या वेळी घरात कोणीच नव्हते. नागेश्वरच्या मागे त्यांची आई व विवाहित बहीण आहे. भिसी पोलिसांनी पंचनामा करून शव हे शव विच्छेदनासाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले आहे. आत्महत्येची वेळ व नेमके कारण कळू शकले नाही.पुढील तपास भिसी पोलीस स्टेशन करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here