चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, गोंडपिपरी येथे दि.16 जुलै 2021 मंगळवारला निरोप व सत्कार समारंभ घेण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्राचार्य दुर्गे,उपमुख्यध्यापक पठाण ,पर्यवेक्षक ऊपरे होते. कार्यक्रमाला नियत वयोमानानुसार निवृत्त झालेले सत्कारमूर्ती म्हणून एमसीव्हीसी विभागाचे प्रा उराडे, प्रा.लोहे,सहाय्यक शिक्षक प्रा.नित सपत्नीक हजर होते. ज्यांची नुकतीच पदोन्नती झाली असे प्रा.वासेकर,प्रा. रेकलवार यांनाही निरोप देण्यात आला. प्रास्ताविक शेंदरे यांनी केले. यानंतर प्रा.बांन्दुरकर,प्रा.नागापुरे,बोडखे,प्रा.बोबडे,प्रा.दिवसे,आत्राम इत्यादी प्राध्यापकानी व शिक्षकांनी आपण घालविलेले क्षण व आठवणी मनोगतातून व्यक्त केल्या व उत्तम आरोग्य साठी प्रार्थना केली .यानंतर प्राचार्यांच्या हस्ते सत्कार मूर्तींचे शाल, श्रीफळ,सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन भावी जीवनाकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्या मनोगतातून प्रा.उराडे यांनी संस्थेचे आभार मानले.प्रा.डॉ लोहे यांनीसुद्धा आपल्या सेवेतील आठवणी व राजकीय जीवनातील अनुभव कथन केले. नित यांनी सुद्धा आपला सेवा कार्यकाळातील प्रवास विशद केला. कार्यक्रमाचे संचालन प्रा.तीतरमारे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा नारनवरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
जनता विद्यालय गोंडपिपरी येथे निरोप व सत्कार समारंभ साजरा..
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
RELATED ARTICLES