तारसा (बुज.) गावातील सांडपाणी वाहून जाणाऱ्या नालीचा त्वरित उपसा करा..# ग्रामपंचायत सदस्य निकेश बोरकुटे यांची मागणी

466

गोंडपिपरी:-गोंडपिपरी तालुक्यातील तारसा बुज येथील वॉर्ड नं. २ सहीत इतर वार्डामधील सांडपाणी वाहून नेण्या करिता नाल्या आहेत. मात्र नाल्या उपसा न केल्याने सांडपाण्याने तुडुंब भरुन असतानाच पावसाळा सुरू होण्या पूर्वीच वेळीच ग्रामपंचायत ने नालीचा उपसा करायला हवा होता. उपसा न केल्याने नालीतील सांडपाणी वाहून न जाता नालीतच जमा होऊन राहत असल्याचे निदर्शनास येत आहे. नालीत सांडपाणी साचून असल्याने याचा नाहक त्रास गावातील नागरीकांना सहण करावा लागत आहे.

त्यामुळे सांडपाणी वाहून जाणाऱ्या गावातील नाली उपसा करण्यात यावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य श्री. निकेश बोरकुटे यांनी केली आहे. नागरीकांच्या घरासमोरुन वाहणाऱ्या व वार्डातील नाल्यामध्ये सांडपाणी साचून असल्याचे नागरिक सांगत आहेत. या संदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. डासांचे प्रमाण वाढून डेंग्यूसह विविध साथीच्या अाजाराची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या द्रुष्टीने वार्ड नं.२ सह गावातील संपूर्ण नाल्याचा उपसा करण्याची मागणी तारसा बुज. ग्रामपंचायत सदस्य निकेश बोरकुटे यांनी केली आहे.