जिवती तालुक्यातील समस्यांचे निराकरण करू -राज्यमंत्री, प्राजक्त तनपुरे…#राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची आढावा बैठक संपन्न..

0
141

दिपक साबने-जिवती
जिवती तालुका विविध समस्येनी ग्रासलेला आहे जिवती तालुक्याचा विकास करण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, नगर विकास, आदिवासी कल्याण, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपले मत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका जिवती च्या आढावा बैठकीत व्यक्त केले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अर्जुनी मोरेगाव चे आमदार मनोहर चंद्रिकर साहेब, राजेंद्रभाऊ वैद्य, जिल्हा अध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा चंद्रपूर,अरुण निमजे,अध्यक्ष, राजुरा विधानसभा क्षेत्र, बेबीताई उईके, महिला अध्यक्षा, नितीन भटारकर , युवक जिल्हा अध्यक्ष,जिल्हा चंद्रपूर, जेष्ठ नेते अबीद अली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कैलास राठोड, तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,जिवती, भीमराव कंचकटले व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.जिवती तालुक्यातील कामाचा आढावा घेत पुढे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले की राज्यातील जनतेला स्वस्त दरात वीज पुरवठा मिळावा याकरिता शासन प्रयत्न करीत आहे यादृष्टीने सौर ऊर्जेवर आधारित वीज निर्मितीला वाव दिल्या जात आहे.तसेच आदिवासी बांधवांना खावटी योजने बाबत व शासन विविध कल्याणकारी शासकीय योजना राबवित आहे त्यांची माहिती देत सदर योजनेचा लाभ जनतेनी घेण्याचे आवाहन केले.
यावेळी तालुक्यातील इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन गजानन आडे यांनी केले तर कार्यक्रमाचे अमर राठोड यांनी केले आणि आभार प्रदर्शन दयानंद राठोड यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here