!!ना.डाॅ.अशोक जी उईके आदिवासी विकास मंत्री, महाराष्ट्र !!
महाराष्ट्र ST मोर्चा ची वर्चुअल बैठक संपन्न
जिल्हा प्रतिनिधी नितेश खडसे
17, ला ठाणे,18,ला.नाशीक,24, नागपूर 25,ला अमरावती येथे ATC स्तरावरील, विभाग स्तरावर भाजपा एस टि मोर्चा महाराष्ट्र तर्फे विभागीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे.या कार्यशाळेत प्रदेश पदाधिकारी, विभाग संयोजक,सह-संयोजक, जिल्हा संयोजक, तालुका संयोजक,गांव संयोजक अपेक्षीत आहेत.अपेक्षीत पदाधिकारी यांनी आपापल्या विभाग कार्यशाळेत उपस्थित राहावे व योग्य प्रशिक्षण घेऊन गांव पातळीवर आदि कर्मयोगी म्हणून आदिवासी समाजाच्या 25 योजनांची अंमलबजावणी यशस्वी पणे पुर्ण करावे असे आवहान महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री ना.डाॅ.अशोक जी उईके यांनी केले
आज आयोजित वर्चुअल बैठकीला मार्गदर्शन करताना ते बोलत होते
आदिवासी मोर्चा चे प्रदेश संघटन मंत्री ॲड श्री किशोर जी काळकर यांनी कार्यक्रम कश्या पद्धतीने यशस्वी करायचे असे मार्गदर्शन करताना म्हणाले,गांव स्तरावरील प्रमुख पुढे आदि कर्मयोगी म्हणून कार्य करणार आहे.भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त आपण 4975 आदिवासी गावांन मध्ये 1 नोव्हेंबर पासुन जयंती व 25 योजना राबविणार आहोत.गांव प्रमुखानी 100 आदिवासी घरात संपर्क करुन त्यांचे नाव व नंबर घेऊन 15 नोव्हेंबर या जनजाती गौरव दिवस कार्यक्रमाचे निमंत्रण द्यावयाचे आहे.व जनजाती गौरव दिवस व भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्याचे निमंत्रण द्यावयाचे आहे
बैठकीचा समारोप या अभियानाचे प्रदेश संयोजक श्री अशोक ईरणाक यांनी केले
बैठकीत प्रदेश पदाधिकारी, विभाग संयोजक सह-संयोजक, जिल्हा संयोजक,सह संयोजक, तालुका संयोजक,सह संयोजक, लोकप्रतिनिधी उपस्थित होते







