तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने प्रेमीयुगल अडकले विवाह बंधनात…

0
2744

(-शेखर बोनगीरवार जिल्हा प्रतिनिधी चंद्रपुर)

गोंडपीपरी येथून जवळच असलेल्या गोजोली येथील श्री प्रमोद विजय बावणे व कु समीक्षा मोरेश्वर डोंगरे यांचे प्रेमसंबंध अनेक वर्षांपासून होते. अनेक वर्षांपासून प्रेमात गुरफडलेल्या प्रेमीयुगलांच्या अनेक अपेक्षा सह सात जन्माच्या गाठी बांधून सुखी संसार थाटायचा,अशी मनाशी बांधलेली गाठ सत्यात परिवर्तीत करायची होती. दोघेही यासाठी प्रयत्नशील होते.परंतु दोघांच्याही घरच्या मंडळी कडून आंतरजातीय विवाहाला विरोध असल्याने, दोघांचाही हिरमोड झाला ,अशात दोघेही महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती गोजोली चे अध्यक्ष श्री. राकेश नीलकंठ प्रधाने यांच्याकडे दिनांक 05/07/2021 ला विवाह लावून देण्यासाठी रीतसर अर्ज केला व विनंती केली.

विनंतीच्या/अर्जाच्या आधारावरून त.मु.स.अध्यक्ष यांनी कागदोपत्री दस्ताऐवज तपासले असता दोघेही बालिक असल्याचे निष्पन्न झाले,आणि दिनांक 06/07/2021 हा दिवस विवाहासाठी निश्चित करून,दुपारी 03:00 वाजता मार्कंडा(देव)येथे हिंदू विवाह पध्दतीने विवाह संपन्न झाले.
या विवाहाला तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री. राकेश प्रधाने,समाज समता संघाचे तालुका अध्यक्ष श्री. शेखर वा.बोनगिरवार व इतरांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here