दुर्गम भागातील सिद्धार्थ चव्हाण गेल्या दीड वर्षापासून सातत्याने गाजवतोय वक्तृत्वाची अनेक व्यासपीठे…

0
52

सिद्धार्थ चव्हाण हा जिवती तालुक्यातील ( रोडगुडा ) या एका 84 घरांच्या वस्तीत राहणारा विद्यार्थी असून ,श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथे पदवीच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहे.

सिद्धार्थने आपल्या वक्तृत्व शैलीच्या माध्यमातून जिल्हास्तरीय,व राज्यातील वक्तृत्व, वादविवाद स्पर्धेत गेल्या गेल्या दीड वर्षापासून सातत्याने छाप सोडतो आहे.

त्याने , आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा येथील वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक, व त्यानंतर वरोरा येथील वादविवाद स्पर्धेत व्दितीय क्रमांक, देसाईगंज वड्सा येथील ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक, त्यापाठोपाठ वरोरा शहरातच झालेल्या विद्यापीठ स्तरीय वादविवाद स्पर्धेत चतुर्थ क्रमांक पटकावला, विद्यापीठ स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक,राष्ट्रीय पातळीवर NSS, NYK आयोजित तालुकास्तरीय ,प्रथम जिल्हास्तरीय व्दितीय, व राज्यस्तरीय फेरीसाठी निवड,
महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक ,नागपूर ( मानेवाडा) येथील राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धेत आदिवासी क्षेत्राच्या विशेष वक्ता पुरस्काराने सन्मानित,त्या पाठोपाठ नेहरू युवा केंद्र चंद्रपूर तर्फे आयोजित जिल्हास्तरीय ऑनलाईन वादविवाद स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक,गुरुदेव सेवा मंडळ नांदा (गडचांदुर ) तर्फे आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोरपना ,जिल्हा चंद्रपूर तर्फे आयोजित ऑनलाईन जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक, संघर्ष फोंडेशन कोल्हापूर तर्फे आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत प्रोत्साहन पर पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे.

एकंदरीत 2020-21 चा वक्तृत्व क्षेत्राचा हा प्रवास असून
या यशाबद्दल सिद्धार्थचे ,आई वडिलांकडून मित्र परिवाराकडून व शिक्षक वर्गाकडून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here