झाडीबोली भाषेचे ऐश्वर्य मोठे आहे.तेथील शब्दभांडार समृद्ध आहे. तेव्हा भाषा अभ्यासकांनी लेखन करण्यापुर्वी बोलीचे व्याकरण , तेथील नाम,क्रियापद,समास ,विभक्ती याचा अभ्यास वाढवायला हवा. नवे बोली साहित्यिक म्हणून पुढे यायला हवे, असे प्रतिपादन झाडीबोली साहित्य मंडळाचे संस्थापक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी केले.दुसऱ्या झाडीपट्टी शब्दसाधक दिनानिमित्ताने आॕनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते.
गेल्या वर्षीपासून एक जुलै हा दिवस झाडीपट्टी शब्दसाधक दिन मंडळातर्फे साजरा करण्यात येत आहे. यावर्षीच्या आॕनलाईन कार्यक्रमाचे नियोजन चंद्रपूर जिल्हा शाखेनी केलेले होते.व्हॕट्सॲप ग्रूपवर झाडीबोली काव्यलेखन स्पर्धा घेण्यात आली तर या दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ कवयित्री झाडीची बहिणाबाई सौ. अंजनाबाई खूणे यांचा वडेगाव येथील घरी जाऊन केंद्रीय समितीच्या वतीने ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी सत्कार केला. याप्रसंगी श्रीराम खूणे आणि डाॕ. विजय खूणे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच शब्दसाधक दिनी ज्यांचा वाढदिवस असलेल्या साहित्यिकांना शुभेच्छा देण्यात आल्यात. आॕनलाईन कार्यक्रमाचे प्रास्तविकातून दिनाचे महत्व बंडोपंत बोढेकर यांनी सांगीतले .सूत्रसंचालन कवी रामकृष्ण चनकापुरे यांनी केले तर आभार अरूण झगडकर यांनी मानले. या आॕनलाईन कार्यक्रमात
ज्येष्ठ साहित्यिक अॕड. लखनसिंह कटरे, पंडित लोंढे, प्रशांत भंडारे , अॕड. सारिका जेनेकर, सुनील पोटे,डाॕ.किलनाके,संतोषकुमार उईके,राजेंद्र घोटकर,विवेक कापगते,विजयकुमार मेश्राम, मुरलीधर खोटेले,सुनील बावणे, सुजित हुलके,प्रदिप मडावी,सौ. कमल सार्वे,प्रा. इंद्रकला बोपचे, लक्ष्मण खोब्रागडे, परमानंद जेंगठे,नागेंद्र नेवारे, संजयकुमार निंबेकर, सुखचंद वाघमारे, मिलिंद रंगारी, अर्जुंमन शेख, प्रा.अश्विन खांडेकर, बेनीराम ब्राह्मणकर,भोजराज कान्हेरकर आदी मान्यवर उपस्थित होते. सुरूवातीला सदस्यगणांनी कार्यपरिचय दिला आणि विविध शाखेच्या वतीने चालणाऱ्या उपक्रमावर प्रकाश टाकण्यात आला.
झाडीबोली साहित्य मंडळातर्फे आॕनलाईन झाडीपट्टी शब्दसाधक दिन साजरा…झाडीबोलीत विविध शब्दांचे समृद्ध भांडार – डॉ. हरिश्चंद्र बोरकर…
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
RELATED ARTICLES