Home चंद्रपूर गोंडपिंपरी मुसळधार पावसात घर कोसळले; गोंडपीपरी तालुक्यातील सकमुर येथील घटना…

मुसळधार पावसात घर कोसळले; गोंडपीपरी तालुक्यातील सकमुर येथील घटना…

784

गोंडपीपरी: तालुक्यात पावसाची सुरुवात झाली असून कधी दिवसा तर कधी रात्रीच्या सुमारास आकाशात मेघ दाटून येतात आणि मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊसाची सुरवात होत आहे.अश्यातच आज दि 1 जुलै रोज गुरवारला गोंडपीपरी तालुक्यातील सकमुर येथील रवी घुबडे यांचे घर पावसामुळे कोसळल्याची घटना घडली.

सुदैवाने जीवित हानी झाली नाही. गोंडपिपरी तालुक्यातील सकमुर येथील रवी घुबडे हे मागील कित्येक वर्षपासून कुडामातीच्या घरात आपल्या कुटुंबासह वास्तव्य करीत आहेत. अश्यातच आज दुपारच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसात त्याचे घर कोसळले. त्यामुळे शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी विनंती घुबडे यांनी केली आहे.

Don`t copy text!