भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने शहरातील स्नेहनगर येथे वृक्षारोपण…

0
102

नितेश खडसे जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

गडचिरोली–सार्वभौम आणि स्वतंत्र भारताच्या एकात्मतेसाठी प्राणार्पण करणारे थोर सेनानी जणसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या हौतात्म्यास अभिवादन करण्यासाठी २३ जुन स्मृती दिनापासून ते ०६ जुलै जन्मदिवसापर्यंत सप्ताह दरम्यान भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने आज दि.२८ जुन रोजी शहरातील स्नेहनगर येथे भाजपा जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक प्रमोद पिपरे यांच्या मार्गदर्शनात व नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या नेतृत्वात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.


यावेळी शहर अध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे,महामंत्री तथा नगरसेवक केशव निंबोड,नप उपाध्यक्ष अनिल कुनघाटकर,महिला आघाडी तालुका अध्यक्ष दुर्गाताई काटवे,शहर महामंत्री विनोद देवोजवार, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर,नगरसेविका रितु कोलते,नगरसेविका वैष्णवी नैताम, नगरसेविका लताताई लाटकर,देवाजी लाटकर,विमल सोमनकर, ठलाल, शिन्दु शेरकुरे, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here