Homeचंद्रपूरगोंडपिंपरीकेंद्रातील मोदी सरकारच्या निषेधार्थ गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीचे ओबीसी आरक्षण संदर्भात धरणे...

केंद्रातील मोदी सरकारच्या निषेधार्थ गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीचे ओबीसी आरक्षण संदर्भात धरणे आंदोलन…

गोंडपिपरी २६ जून:

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश्याध्यक्ष मा.आ.नानाभाऊ पटोले साहेब यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षण मुद्द्यावर राज्यभर विविध ठिकाणी काँग्रेसच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. सुभाषभाऊ धोटे यांचे मार्गदर्शनाखाली आज गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने ओबीसी आरक्षण मुद्द्यावर केंद्र सरकारच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले.

आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून ओबीसी आरक्षण संपविणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारचा धरणे आंदोलनात जाहीर निषेध करण्यात आला.
संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी बांधवाना राजकीय आरक्षित्तेतून वंचित ठेवण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे.संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील सर्व जनतेला वर्गवारी आरक्षण उपलब्ध करून दिले. परंतु केंद्र सरकार प्रत्यक्षात आरक्षण विरोधी राहून आपला आरक्षणाला विरोध नाही अशी लुपाछुपी खेळत आहे. ओबीसी आरक्षण हिरावने हा केंद्र सरकारकारचा अजेंडा आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण पूर्ववत करावे, जनगणनेत ओबीसी कालमनुसार ओबीसी जनगणना करावी.ज्यामुळे ओबीसी बांधवांना शैक्षणिक,राजकीय, पदभरती, पदोन्नती मध्ये या आरक्षणाचा लाभ होईल.विविध योजना देश्यातिल ओबीसी बांधवांना उपलब्ध होतील आणि योजनांचे लाभ घेता येतील.असे अनेक मुद्दे ठेऊन आज गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने ओबीसी आरक्षण संदर्भात धरणे आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी श्री. सुरेशराव चौधरी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती गोंडपिपरी, श्री. तुकाराम झाडे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी गोंडपिपरी, रेखाताई रामटेके महिला अध्यक्ष तालुका महिला काँग्रेस कमिटी गोंडपिपरी, देवेंद्र बट्टे शहराध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी, प्रा.शंभुजी येलेकर, गौतम झाडे अध्यक्ष अनु. जाती विभाग काँग्रेस कमिटी, संतोष बंडावार अध्यक्ष युवक काँग्रेस कमिटी, राजिवसिन्ह चंदेल, नामदेव सांगडे, विनोद नागापूरे अध्यक्ष संजय गांधी निराधार समिती, रामचंद्र कुरवटकर, प्रवीण नरहरशेट्टीवार, प्रदीप झाडे, सचिन फुलझेले, राजु भाऊ राऊत, उलेंदला पोचमल्लू, जितेंद्र गोहणे, देवराव थोर, अभय शेंडे संचालक कृ.ऊ.बा.स., वनिताताई वाघाळे, प्रकाश हिवरकर, शंकर येलमुले, सुरेखा चोपावार,शालू बावणे, काजल शेंडे, ज्योती मेश्राम, वैशाली आत्राम यासह विविध विभागाचे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!