भाजपाचे सिरोंच्यात रास्ता रोको आंदोलन…आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाकडे दुर्लक्ष केल्याने आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आली:- शंकर नरहरी

0
143

विजय तोकला,सिरोंचा

सिरोंचा:- ओबीसी आणि मराठा आरक्षणाकडे महाविकासआघाडी सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे निषेधार्थ आज राज्यभरात भाजपकडून राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून सिरोंचा भाजपाच्या वतीने आंदोलने करण्यात आले.
सिरोंचा शहरातील भाजपा कार्यालयापासून हलगी नाद करत भाजपा कार्यकर्त्यांकडून शहरातील बसस्टॅण्ड आलापल्ली मार्गे जाणारी रोडवर ठिय्या मांडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले.सदर आंदोलनात शहर व तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभाग होता. आंदोलनादरम्यान महाविकसआघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
ओबीसी आरक्षण मिडू नये म्हणून महाविकसआघाडी सरकारने जाणूनबुजून प्रयत्न केले आहेत.पंधरा वेळी इंपिरियल डाटा मागूनही न्यायालयात सादर केले नाही त्यामुळे ओबीसी आरक्षण रद्द झाले.आरक्षण रद्द करण्यासाठी आघाडी सरकारने जाणूनबुजून केलेली ही कृती ओबीसीच्या विरोधातील ह्या सरकारने ओबीसीचे फार मोठे नुकसान केले असल्याचे आरोप सिरोंचा तालुकाध्यक्ष शंकर नरहरी यांनी यावेळी केला.
यावेळी उपस्थित भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री दामोदर अरिगेला,श्री,माजी आरडा सरपंच श्री बापन्ना रंगुवार,माजी तालुका अध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक श्री संदीपभाऊ राचारला,माजी तालुका अध्यक्ष श्री कलाम हुसेन,महामंत्री श्री माधव कासारला,श्री रवी चकिनारपू,आदी होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here