वैनगंगा नदीपात्रात आढळले महिलेचे शव…ब्रम्हपुरी तालुक्यातील घटना…

0
461

ब्रम्हपुरी : तालुक्यातील रणमोचन (खरकाळा) वैनगंगा नदी काठावर एका महिलेचे प्रेत दिनांक काल 18 जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता च्या सुमारास आढळून आल्याने खळबळ उडाली.
सदर घटनेची माहिती ब्रहमपुरी पोलिसांना देण्यात आली ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांनी वेळीच दखल घेत सदर महिलेचे प्रेत ब्रह्मपुरी येथे शवविच्छेदनासाठी पाठवले आहे सदर महिलेची ओळख पटली असून शालू गिरीधर चंदनखेडे वय ( 35 ) असे मृतक महिलेचे नाव आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here