Home चंद्रपूर मूल जबरानजोत शेतकऱ्यांना त्रास दिला तर कायदा हातात घेणार:- राजू झोडे...

जबरानजोत शेतकऱ्यांना त्रास दिला तर कायदा हातात घेणार:- राजू झोडे…

मुल:- मागील कित्येक वर्षापासून आदिवासी व इतर पारंपारिक वननिवासी जबरानजोत शेतकरी शेती करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. अशा जबरानजोत शेतकऱ्यांना शेती पासून वंचित करण्याचे कट-कारस्थान वनविभागाचे अधिकारी गुरुप्रसाद आणि वन अधिकारी करत आहेत असा आरोप राजू झोडे यांनी केला.
मूल तालुक्यातील पारंपारिक आदिवासी व गैर आदिवासी शेतकरी यांना वनअधिकारी शेती करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. सदर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे दावे टाकले असताना व ते प्रलंबित असताना वनाधिकाऱ्यांना शेती करण्यापासून रोखण्याचा अधिकार नाही. वन हक्क कायद्यानुसार जिल्हाधिकारी व तहसीलदार हे वनहक्क समितीचे प्रमुख असतात. जर त्यांच्या आदेशाचे पालन वनअधिकारी करत नसतील तर जबरान जोत शेतकऱ्यांना घेऊन कायदा स्वतः हातात घेणार असा इशारा राजू झोडे यांनी माननीय तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला. शेतीचे हंगाम सुरू झाले असताना जाणीवपूर्वक वन अधिकारी शेतकऱ्यांना शेतीपासून रोखतात व त्यांना धमक्या देतात. ही बाब अतिशय निंदनीय असून जगाचा पोशिंदा शेतकरी यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम वनविभागाचे अधिकारी करत आहेत.
आज मूल तालुक्यातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन राजू झोडे यांनी तहसीलदार यांच्याशी चर्चा केली व सदर शेतीचे दावे प्रलंबित असताना वनाधिकार्‍यांनी शेतकऱ्यांना शेती करण्यापासून रोखू नये असा तात्काळ आदेश काढावा अशी मागणी केली. वन विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांना जर शेती करण्यापासून रोखत असतील तर स्वतः कायदा हातात घेणार व आपल्या पद्धतीने शेतकर्‍यांना सोबत घेऊन उत्तर देणार अशी तंबी वन प्रशासनाला राजु झोडे यांनी दिली.
जबरान जोत शेतकऱ्यांनी राजू झोडे यांच्या नेतृत्वात तहसीलदार मूल यांना निवेदन दिले. शेतकऱ्यांना प्रशासनाने तात्काळ न्याय दिला नाही तर जबरानजोत शेतकर्‍यांच्या सर्व कुटुंबांना घेऊन तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असा इशारा राजु झोडे यांनी प्रशासनाला दिला.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

भूमिपुत्र ब्रिगेडने केले भूमिपुत्र शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मदत

मूल: तालुक्यातील फुलझरी गावातील शेतकरी रघुनाथजी मोहूर्ले याचे धान पीक औषध फवारणीमुळे जळाले, दिवाळीच्या समोर गरीब शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले. वर्षभर केलेली मेहनत काही...

गौरव शामकुळे नी पकडला राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा

मूल- चळवळीतील कार्यकर्ता, कामगार नेता, आप आदमी पक्षाचे युवक अध्यक्ष अशी वाटचाल करीत सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी झटणारा कार्यकर्ता अशी ओळख निर्माण करणाऱ्या...

नाते आपुलकीचे संस्थेने अनुरागच्या भवितव्यासाठी दिला मदतीचा हात…

समाजातील होतकरू,गरजू आणि परिस्थितीने बिकट अशा शिक्षण घेत असलेल्या मुलाला मदतीचा हात देऊन त्याचे भविष्य उज्वल करण्याच्या दिशेने नाते आपुलकीचे संस्थेने एक हात समोर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

यूजीसी नेट’च्या अर्जासाठी ३० मेपर्यंत मुदतवाढ

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या (यूजीसी नेट) अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता उमेदवारांना ३० मेपर्यंत अर्ज भरता येईल. यूजीसीचे अध्यक्ष प्रा....

राष्ट्रवादीच्या पती- पत्नी नगरसेवकानी प्रभागाच्या विकासासाठी मागितला दोन कोटींचा निधी…

गोंडपिपरी(सुनील डी डोंगरे) येथील नगरपंचायतीचे नगरसेवक महेंद्रसिंह चंदेल ,त्यांच्या नगरसेविका पत्नी सौ सविता महेंद्रसिंह चंदेल यांनी आपापल्या प्रभागाच्या विकासासाठी दोन कोटी रु च्या निधीची मागणी...

राजुऱ्याच्या रेतीमाफियांनी उडवली गोंडपिपरीकरांची झोप…# महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह…# रात्रंदिवस चालणाऱ्या बेलगाम रेतीवाहतूकीला ब्रेग लागणार का ? तालुकावासियांचा सवाल

गोंडपिपरी :-तेलंगणासिमेवर वसलेल्या गोंडपिपरी तालुक्यात अवैध धंदे चांगलेच फोपावले आहेत.या गोरखधंद्यात सामान्यापासून मात्तबरांचा छूपा सहभाग दडला आहे.असे आसतांना आता गोंडपिपरी तालुक्यातील रेतीघांटावर राजूरा येथिल...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मंत्राचा कोलामगुड्यावर मुक्काम;कोलम बांधवांच्या जाणून घेतल्या व्यथा…

बळीराम काळे /जिवती जिवती:जिल्ह्यातील अतिदुर्गम,अतिमागास,आदिवासी बहुल, दुर्गम भागातील सितागुडा या कोलामगुड्यावर बच्चू कडू,राज्यमंत्री यांनी त्यांच्यासोबत मुक्काम ठोकला. स्वातंत्र्यानंतर एखाद्या मंत्र्यांनी भेट देऊन आदिवासी गुड्यावर मुक्काम...

Recent Comments

Don`t copy text!