गोडपिपरी तालुक्यांतील अडेगाव येथे परिसरात विजेचा लपंडाव…

0
449

शरद कुकुडकार भंगाराम तळोधी

*विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची गांवकराची मागणी*
गोडपिपरी तालुक्यांत अडेगांव येथे परिसरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. दर एक ते दोन तासाला किंवा वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असतो. वातावरण खराब असो किंवा नसो विद्युत पुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून ग्राहकांना सुरळीत विद्युत पुरवठा करणे महावितरण कंपनीचे काम आहे. तरी परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा व विद्युत ग्राहकांना चांगली सुविधा द्यावी करिता
जर सदर मागणीची दखल घेऊन विद्युत पुरवठा तात्काळ सुरळीत केला गेला नाही तर गांवकरी आक्रमक पवित्रा घेणार व महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here