ग्रा.पं.चिखली खुर्द येथील निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी नाही झाली तर पाण्याच्या टाकीवर चढून विरुगीरी आंदोलन करु..प्रहार संघटनेचे रुग्णसेवक जिवन तोगरे यांचा खणखणीत इशारा…

491

दिपक साबने,जिवती
गटविकास अधिकारी जिवती यांना निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी बाबत आतापर्यंत अनेक तक्रारी देऊन सुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे ?. सद्यस्थितीत कोरोना चा संसर्ग आहे म्हणुन घरी बसायचं का ? शासनाचा पैसा हा सर्वसामान्य माणसाच्या घामातुन उभा होतो यातून होणारी विकासकामे दर्जेदारच असली पाहिजे.
ग्राम पंचायत चिखली खुर्द अंतर्गत पाटागुडा गावात ग्रंथालयाच काम अतिशय निकृष्ट दर्जाच झालं आहे. विकासकामाला विरोध नाही. मात्र निकृष्टदर्जाची कामे का म्हणून खपवून घ्यायची ? गावविकासासाठी आम्ही सोबत आहोत मात्र शासनाच्या पैशाचा योग्य विनियोग होतं नसेल तर व निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी अधिकारी करीत नसेल तर वेळप्रसंगी पाण्याच्या टाकीवर चढून विरुगीरी आंदोलन करु मात्र ग्राम पंचायत चिखली खुर्द येथील निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी झाल्याशिवाय शांत बसणार नाही. असा खणखणीत इशारा प्रहार संघटनेचे रुग्णसेवक जिवन राजाराम तोगरे यांनी दिली आहे.
ग्राम पंचायत चिखली खुर्द अंतर्गत चार गावे येतात चिखली, पाटागुडा, कामतगुडा, पालडोह या चारही गावात विविध योजनेतून काम होत आहे. विकासकामामुळे गावांच्या विकासालाही सजग दृष्टी प्राप्त होते परंतु ग्रामसेवक, सरपंच, ठेकेदार व इंजिनियर यांचा मनमानी कारभार सुरू आहे. तसेच ग्रामसेवक सरपंच, इंजिनियर, हे अधिकारी ठोकेदार कडून पैसे घेऊन गावातील कामे निकृष्ट दर्जाचे करीत आहेत यामुळे गाव विकासालाही खिळ बसली आहे असे चित्र ग्रामपंचायत चिखली खुर्द येथे दिसत आहे. चिखली खुर्द ग्रामपंचायत कडे प्रशासकीय अधिकारी हे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे ? असा आरोप सुध्दा जिवन तोगरे प्रहार रुग्णसेवक यांनी केला आहे. निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी लवकरात लवकर नाही केली तर पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी आंदोलन करू असा खणखणीत इशारा जिवन तोगरे प्रहार रुग्णसेवक यांनी केला आहे.