आई, मुलगा आणि आता वडीलाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ…

0
740

दिलीप सोनकांबळे
पुणे :* चिमुरड्याचा आणि त्याच्या आईचा खून करून त्या दोघांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी टाकल्याच्या प्रकरणात बेपत्ता असलेला महिलेचा पती आबिद अब्दुल शेख याचा मृतदेह आढळून आला आहे.
या घटनेने एकच खळबळ उडाली असून, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे.
पुण्यातील दुहेरी खून प्रकरणाचा तपास चालु असतानाच बेपत्ता असलेल्या आबिद शेखचा मृतदेह आढळल्याने आता तपासाला गती मिळणार की भलतच काही तरी निष्पन्न होणार हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांनी खून प्रकणाचा तपास युध्दपातळीवर सुरू केला आहे.
आबिद अब्दुल शेख (वय 38 ) असे मृतदेह मिळालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर आयान आबिद शेख (वय 7) आणि आलीया आबिद शेख (वय 35) या माय-लेकाचा खुन झालेला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आज (शुक्रवार) सकाळी हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खानापूर येथील एका नदीच्या पाण्यात मृतदेह आढळून आला.
त्यानंतर हवेली पोलीस व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पाहणी करण्यात आली.
त्यात तो मृतदेह आबिद शेख याचा असल्याचे समोर आल्यानंतर ही माहिती पुणे ग्रामीण पोलीस यांनी तात्काळ पुणे पोलिसांना दिली.
त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी खात्रीसाठी पथकाने आता धाव घेतली आहे.
दरम्यान, त्याचा खून झाला की त्याने आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे नेमकं घडलं काय याच गूढ अद्यापही उलगडलेले नाही.
मात्र, त्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here