Homeचंद्रपूरगोंडपिंपरीधामनपेठ जंगल कामगार सहकारी संस्थेत लाखोंचा घोळ...अप्पर पोलीस अधीक्षकांकडे केली तक्रार

धामनपेठ जंगल कामगार सहकारी संस्थेत लाखोंचा घोळ…अप्पर पोलीस अधीक्षकांकडे केली तक्रार

नागेश इटेकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)

आदिवासींच्या हाताला काम देऊन जंगलातील कामे पारदर्शकतेने पूर्ण करण्याच्या हेतुने तालुक्यात धामणपेठ जंगल कामगार सहकारी संस्था कार्यरत आहे.तालुक्यात आदिवासी जंगल कामगार संस्था ही सर्वात मोठी सहकारी संस्था असल्याचे बोलले जाते.काही महिन्यांपूर्वी या संस्थेचे माजी अध्यक्ष भाऊजी कुळीराम मडावी यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव पारित करून दिनांक १६/४/२०२१ ला पूनरनिवडणुक घेण्यात आली त्यात खेमचंद गरपल्लिवार यांच्या गटाचा बहुमताने विजय झाला आणि मंदाबाई दत्तू कुळमेथे यांची संस्थेच्या अध्यक्ष पदी वर्णी लागली.

धामनपेठ जंगल कामगार सहकारी संस्था भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकली असून संस्थेचे माजी सचिव वासुदेव सातपुते व माजी अध्यक्ष भाऊजी मडावी यांच्या कार्यकाळात संस्थेत लाखोचा भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्या कडे केली असता त्यांनी सदर तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधीत प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांच्या मार्फत करण्याचे निर्देश दिले असल्याचे विद्यमान अध्यक्षा मंदाबाई दत्तू कुळमेथे यांनी पत्रपरिषदेत सांगितले आहे.

संस्थेत गैरव्यवहार घडवून आणणारे तत्कालीन पदाधिकार्यांच्या कार्यकाळात संचालक मंडळाच्या मासिक सभा झाल्या नाही तरी देखील रजिस्टरवर सभा झाल्याचे नोंदी नमुद केल्या आहेत.दिनांक २०/३/२०२०,१७/६/२०२०,
७/८/२०२०,६/९/२०२०,
११/१०/२०२०,१५/११/२०२०,१३/१२/२०२०,११/१/२०२१,
४/२/२०२१,१९/३/२०२१ मध्ये झालेल्या सभेत विद्यमान अध्यक्षा तसेच त्यांचे ईतर सदस्य गण उपस्थित नव्हते,शिवाय त्यांना सभेचे नोटीस देखील दिले नाहीत.
असा खुलासा त्यांनी यावेळी केला.

दरम्यान च्या काळात संस्थेच्या मालकी हक्काच्या इमारतीत भाडेकरू दुकानदारांकडून ७९००० हजार रुपये इतकी रक्कम भाडे तत्वावर वसूल करण्यात आली त्याचप्रमाणे ७००० हजार रुपये इतकी रक्कम बँकेतून परस्पर काढण्यात आली. आणि स्वतःच्या मानधनावर ६३२६८ रुपये इतका खर्च करण्यात आला असे संस्थेच्या कॅशबुकात नोंद दाखविण्यात आला असल्याचे देखील सांगण्यात आले.

त्यामध्ये संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष व सचिव या दोघांच्या संगनमताने व्यवहारात लाखोंचा अफरातफर झाला असल्याचे किंगमेकर खेमचंद गरपल्लिवार तसेच विद्यमान अध्यक्षा नंदाबाई दत्तू कुळमेथे यांनी घणाघाती आरोप केला असून संस्थेचे सचिव वासुदेव सातपुते यांनी नियोजनबद्ध गैरप्रकार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!