Advertisements
Home Breaking News समाजाची 'स्त्री'विषयक भूमिका सोयीची व दुटप्पीपणाची- अॕड. वैशाली डोळस

समाजाची ‘स्त्री’विषयक भूमिका सोयीची व दुटप्पीपणाची- अॕड. वैशाली डोळस

नागपूर: भारतीय संविधान लागू झाल्याच्या एवढ्या वर्षानंतरही समाजात कोणत्याही पातळीवरील समानता तर दूरच माणूस म्हणून स्त्रियांना वागवलं जात नाही. भारतीय समाज व्यवस्थेत स्त्रियांना माणूस मानले जातच नाही. स्त्रिया ह्या अतिशूद्राच्याही खालच्या स्तरावरील अवर्ण ठरवल्या गेल्यात. भारतीय संविधानाने आपली समानतेची व न्यायाची भूमिका बजावली असली तरी समाजाने मात्र आपली भूमिका सोयीची व दुटप्पीपणाची ठेवली आहे, असे परखड विचार अॕड. वैशाली डोळस यांनी व्यक्त केले.

Advertisements

संविधान फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘संविधानाची शाळा’मध्ये ‘संविधान जागृतीची आवश्‍यकता : स्त्रिया आणि शिक्षण’ या विषयावरील सातव्या संवादात डॉ. बबन जोगदंड यांनी संवाद साधला असता त्या बोलत होत्या. यावेळी माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे व संविधान फाऊंडेशनचे प्रा. डॉ. महेंद्रकुमार मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून विवेक कांबळे यांनी संविधान शाळेच्या संवादास सुरुवात केली.

पुढे बोलताना अॕड. वैशाली डोळस म्हणाल्या की, केवळ राजकीय समानता कामाची नाही, ती आर्थिक व सामाजिक स्तरावर सुद्धा असली पाहिजे. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांना संपत्तीमध्ये समान वाटा दिला. शेतीचा शोध स्त्रियांनी लावला असला तरी पुरुष शेतात आणि स्त्री घरात अशी श्रमविभागणी करण्यात आली. जात ही स्त्रीच्या गर्भातून जन्माला येत असून जातीचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी तथा जातीचे कप्पे मजबूत करण्यासाठी स्त्रियांवर कठोर निर्बंध घालण्यात आले. स्वतःच्या हक्क व अधिकाराची लढाई लढण्याची मानसिकता अजूनही स्त्रियांमध्ये तयार झाली नाही. समाजातील विषमतेच्या भिंती तोडून समानता व न्याय प्रस्थापित करण्यासाठी देशातील सर्व मंदिरांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करावे तसेच सर्व प्रकारचे शिक्षण स्त्रियांना मोफत दिले जावे. संपत्तीत समान हिस्सा दिल्यास स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य व बळ मिळेल. स्त्रियांच्या प्रश्नावर कोणीही बोलायला तयार नाही. जातीव्यवस्था ही शोषण करते. जातीव्यवस्थेला सुरुंग लावण्याचे काम स्त्रिया करू शकतात म्हणूनच धर्म आणि परंपरांच्या तटबंदी निर्माण केल्या गेल्यात.भारतीय संविधानाची प्रास्ताविका मूल्यव्यवस्था सांगते. ती जनमानसात रुजविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. कमल पाणी आण, आई भाजी कर, बाबा पेपर वाचतात, बंड्या खेळत आहे, अशी ही लिंगाधारित विषमतावादी शिक्षण व्यवस्था बदलली पाहिजे. आदर्श म्हणून दिली जात असलेली उदाहरणे भारतीय संविधानानुसार असावीत. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊची जीवनमूल्ये शिक्षणातून पेरावी लागतील. त्यासाठी समाजातील प्रतिष्ठेचे मापदंड बदलणे गरजेचे आहे. भारतीय संविधानाने स्वीकारलेली जीवनमूल्ये प्रत्यक्ष जगण्यात आणावी लागतील, असे प्रतिपादन अॕड. वैशाली डोळस यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचा समारोप करताना संविधान फाऊंडेशनचे संस्थापक इ. झेड. खोब्रागडे म्हणाले की, देशाच्या संविधानाचा जागर करणे हे राष्ट्रनिर्माणाचे काम आहे. त्यासाठी विविध उपक्रमांसह संविधानाची शाळा कार्यान्वित करण्यात आली आहे. देशात सत्याचा विपर्यास केला जातो. ज्यांच्या हातात राज्यकारभार आहे, त्यांना संविधानिक मूल्ये समजली आहेत काय? हा मोठा प्रश्न आहे. महिलांना नागरिक म्हणून संविधानाने ओळख आणि अधिकार दिले आहेत. संविधानाचे संस्कार कुटुंबीयांमध्ये रुजविण्यासाठी स्त्रियांना माणूस मानणे, ही पहिली पायरी आहे. कायदेविषयक साक्षरतेच्या धर्तीवर संविधान साक्षरतेसाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सुशिक्षितांची ती जबाबदारी आहे. सविधान आपल्यासाठी नसुन विशिष्ट वर्गासाठीच आहे असा गैरसमज समाजामध्ये पसरविला जातो. तो दूर करण्याची नितांत गरज आहे, असे विचार इ. झेड. खोब्रागडे यांनी यावेळी व्यक्त केले. संवाद कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दीपक निरंजन यांनी केले.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

सफरचंद खाण्यासाठी गेलेल्या ६ वर्षाच्या मुलाचा विषारी साप चावल्याने मृत्यू…

-ब्युरोचिफ प्रशांत शाहा बीड : बीडच्या धारुर तालुक्यातील वाघोली येथे कपाटात ठेवलेले सफरचंद खाण्यासाठी गेलेल्या 6 वर्षाच्या चिमुकल्याला विषारी साप चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. आदित्य...

स्वर्गीय शांताराम पोटदुखे यांच्या स्मृती प्रित्यर्थ मोफत आरोग्य तपासणी शिबिर…

श्याम म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा संपादक) चंद्रपुर: स्वर्गीय शांताराम पोटदुखे यांच्या स्मृती प्रित्यर्थ क्राईस्ट रुग्णालय, चंद्रपुर व सुशीलाबाई रामचंद्र मामिडवार समाजकार्य महाविद्यालय, पडोली यांच्या संयुक्त विद्यमाने...

राज्यात सर्वाधिक मध्यपी महिला धुळे जिल्ह्यात तर पुरुषामध्ये गडचिरोली जिल्हा पहिल्या स्थानावर

 नागपूर : मद्यपानामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण होत असून अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. परंतु, मद्यविक्रीतून येणारा महसूल बघता राज्य आणि केंद्र सरकारच मद्य...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

म. गांधींच्या विचारधारेनेच देशातील अराजकता संपुष्टात येणार – आ. वडेट्टीवार…गांधी के रास्ते पदयात्रेचा सावली येथे समारोप

सावली: देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी उभे आयुष्य पणाला लावणारे खरे देशभक्त महात्मा गांधी हे होय. त्यांचे नीतिमूल्ये व मानवतावादी विचार आजच्या अराजक्तेच्या काळात प्रत्येकामध्ये रुजविणे...

तालुक्यातील बरेचसे पशुधन लंम्पी या आजाराच्या विळख्यात सापडल्याचे चित्र…#बाधित क्षेत्रातील २६ गावातील ६९०४ पशुधनांवर लसीकरण

बळीराम काळे,जिवती जिवती (ता.प्र.) तालुक्यात लम्पी या संसर्गजन्य आजारांने जिवती तालुक्यातही आपले पाय पसरविले आहे,त्यामुळे जिवती, शेणगाव व येल्लापुर या गावापासून पाच किलमीटरवर त्रिजेचा परीसर...

दुर्गापूर पाणीपुरवठा योजनेला जिल्हास्तरीय मंजुरी….राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर यांच्या प्रयत्नाला यश…

चंद्रपुर: तहसील जिल्हा चंद्रपूर येथील ग्रामपंचायत दुर्गापुर गावाची लोकसंख्या २६ हजार च्या वर असून दुर्गापूर येथील सद्यस्थितीत ६ लाख २५ हजार लिटर पाणी क्षमता...

वृक्षाई पर्यावरण फाउंडेशन आणि आम आदमी पार्टीच्या संयुक्त विद्यमाने इरई बचावसाठी जल सत्याग्रह व साखळी उपोषण

चंद्रपुर: १९८१ मध्ये चंद्रपुर थर्मल पॉवर स्टेशन ची निर्मिती झाली. त्यासाठी पुरवठ्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या इराई नदीवर असलेल्या धरणामुळे, धरणानंतर ही नदी संकुचित झाली....

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!