जिल्हा ग्रामीण रुग्णालय, अहेरी येथे जागतिक रक्तदान दिन रक्तदान करून साजरा..

0
99

प्रितम गग्गुरी (आल्लापल्ली प्रतिनिधी)

जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे जिल्हा ग्रामीण रुग्णालय अहेरी येथील रक्तकेंद्र ( Blood Center ) अहेरी जागतिक रक्तदाता दिवस प्रसंगी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

रक्तदान शिबिरात एकूण 21 लोकांनी रक्तदान केले. त्यात Blood Center चे Technician निखिलकुमार कोंडापर्ती आणि एक महिला स्टाफ नर्स प्रेरणा झाड़े यांनी सुधा आपली जबाबदारी निभावली.

तसेच रक्तदूत विकास तोड़साम , आदेश मंचलवार, किशोर अग्गुवार, कृणाल सल्लम, हर्षित करपेत, संतोष एलमुले, फरमान शेख , निर्णय जाम्भूले , साई बेज्जलवार , रवि एलमुले, सुजल रतने, अभी पड़गेलवार, राहुल मेश्राम, चेतन दंडिकवार, रोहित पाले, अनिकेत मिसरी , योगेश कन्नाके , व इतर 4 लोकानी रक्तदान केले.

रक्तदान शिबिराचे महत्व व मार्गदर्शन डॉ. अनंत जाधव सर यांनी केले व् तसेच शिबिरास वाघ मैडम, शिरीन मैडम व शरद भाऊ यांनी सहकार्य केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here