संजीवनी फाऊंडेशन गडचिरोली व चरित्र कलादर्पण यांच्यातर्फे आयोजित विद्यापीठ स्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न…

0
162

दि.4 जून 2021
संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र शाखा गडचिरोली व चरित्र कलादर्पण कडून विद्यापीठ स्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन दि.4 जून 2021 रोजी डॉ. नरेंद्र आरेकर सरांचा हस्ते झाले. या कार्यक्रमात डॉ. प्रिया गेडाम माझी संचालक विद्यार्थी विकास विभाग गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली ये उपस्थित होते. तसेच कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती संजीवनी फाऊंडेशन चे चेअरमन तसेच राष्ट्रीय युवा प्रेरणा पुरस्कार प्राप्त मा. ज्ञानेश्वर वसंतराव सानप यांची होती. हा कार्यक्रम दि.7 जून 2021 पर्यंत असणार आहे. या कार्यक्रमाला मान्यवरांनी शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचे यशस्वी उद्धघाटन केले. या कार्यक्रमात चरित्र कलादर्पण चे प्रमुख मा. सचिन बरडे विस्तार समिती अध्यक्ष तथा नागपूर विभाग प्रमुख राजेश बसवेश्वर हजारे, संजीवनी फाऊंडेशन गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष सूरज चौधरी, व या कार्यक्रमाचे संयोजीका कु. रागिणी स्वामी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी या चार दिवसीय कार्यशाळेत सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आव्हान चरित्र कलादर्पण चे प्रमुख सचिन बरडे व विस्तार समिती अध्यक्ष व नागपूर विभाग प्रमुख राजेश बसवेश्वर हजारे, सूरज चौधरी जिल्हाध्यक्ष संजीवनी फाऊंडेशन गडचिरोली यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका हिने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here