सायकल स्नेही मंडळातर्फे जागतिक सायकल दिन संपन्न ….

0
107

गडचिरोली (प्रतिनिधी )- जागतिक सायकल दिनानिमित्त गडचिरोली सायकल स्नेही मंडळातर्फे विशेष रॅलीचे नियोजन करण्यात आले होते. कोवीड नियमांचे पूरेपूर पालन करून मंडळाच्या सदस्यांनी स्वेच्छेने गडचिरोली चांदाळा पोटेगाव या निसर्गरम्य भागात सायकल भ्रमंती केली. पोटेगाव टी पाईंटवर एकत्र आल्यावर मंडळातर्फे ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी सायकल चे मानवी जीवनातील स्थान यावर भाष्य करून उपस्थित सदस्यांना सायकल दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. सदस्यगणांचा परिचय आणि प्रास्तविकपर मनोगत प्रा. विलास पारखी यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी सायकल स्नेही प्राचार्य मनिष शेटे, प्राचार्य भांडेकर ,प्रा. अनिल शेटे, प्रा. उल्हास आखाडे, प्रा.अरूण पालारपवार ,किशोर पाचभाई , प्रकाश मोहीतकर, राजु बार , प्रा. अविनाश गौरकर , राजु बैस ,प्रा.प्रकाश सोनवणे , प्रमोद राऊत ,गडपल्लीवार ,पुसदेकर,घोटेकर, बेहरे टेलर आदी सायकल स्नेही सहभागी झाले होते. ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्रत्येक सदस्य स्वेच्छेने वृक्षारोपण आणि काही झाडांचे बिजारोपण करणार आहे, हे विशेष.आभार प्रमोद राऊत यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here