नागेश ईटेकर
तालुका प्रतिनिधी
गोंडपिपरी: शेतकरी हा जगाचा पोशींदा आहे तो स्वता अहोरात्र मेहनत करून पिक घेत्याचा प्रयत्न करतो पण सरतेशेवटी त्याचे हे प्रयत्न अस्मानी किंवा सुलतानी संकटांनी वाया जाते. दुष्काळाची भीषणता गिळून टाकत आहे. कर्जाचा डोंगर मुद्दलापेक्षा दुप्पट व्याजाने जीवघेणा झाला आहे. उपाशी बायका-पोरांना बघवत नाही. हाडं हाडं झालेली मुकी जनावरं सुद्धा खूप काही सांगत असतात. सणासुदीला नवा कपडा तर सोडाच पण अंगभर कपडाही नशिबी नाही.घराच्या भिंतीला भोके, कपड्यांना ठिगळं असं भिकार जीवन शेतकऱ्यांच्या नशिबी आले आहे.अश्यात शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय..?
कर्जमाफी देण्यात आली, सावकारकी बंद करण्यात आल्या आणि बँकांमार्फत शेतकऱ्यांना मदत देऊ करण्यात आली. या साऱ्या गोष्टी केल्याचा गाजावाजा भरपूर झाला.पण खरोखरच सामान्य शेतकऱ्यांपर्यंत या साऱ्या योजना पोहोचल्या आहेत का? याची शासनाने कधी खात्री करून घेतली का? मागील वर्षीपेक्षा या वर्षी तालुक्यातील शेतकरी मक्याचे भरघोस पीक घेतले आहे.गत वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा गोंडपिपरी येथे शासकीय मक्का खरेदी केंद्र सुरू करणार असे स्वप्न शेतकऱ्यांना दाखविण्यात आले परंतु ती घोषणा वाऱ्यावरच राहिली.
मक्का खरेदी केंद्र सुरू न केल्या मुळे नाईलाजाने तो माल व्यापाऱ्यांना आता कमी दरात विकावे लागत असल्याने मक्का उत्पादक शेतकऱ्यांची फसगत झाली आहे. गत वर्षी मक्का खरेदी केंद्र सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना १८०० रुपये प्रति क्विंटल हमी भाव मिळाला असता शेतकरी आनंदात होता परंतु या वर्षी आश्वासन देऊन सुद्धा मक्का खरेदी केंद्र सुरू न केल्या मुळे तो माल व्यापाऱ्यांना मात्र १३०० रुपये प्रति क्विंटल या दराने विकावे लागत आहे.अस्या प्रकारे मक्का उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे आणि ती फसवणुक थांबविण्यासाठी गोंडपिपरीत त्वरीत शासकीय मक्का खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे असा शेतकऱ्यांच्या हित संबंध जोपासत जिल्हा परिषद सदस्या वैष्णवी अमर बोडलावर यांनी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनार्थ मागणी केली आहे.